Sidhu Musewala Murder: सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कुणी केली? समोर आलं कॅनडा कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 11:45 PM2022-05-29T23:45:50+5:302022-05-29T23:47:35+5:30

पोलिसांना संशय आहे, की विक्की मुद्दुखेडा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने आपल्या गुंडांच्या करवी सिद्धू मुसेवालाची हत्या केलेली असू शकते.

sidhu moosewala death case gangster residing canada goldy barad took responsibility | Sidhu Musewala Murder: सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कुणी केली? समोर आलं कॅनडा कनेक्शन!

Sidhu Musewala Murder: सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कुणी केली? समोर आलं कॅनडा कनेक्शन!

googlenewsNext

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात मानसाचे एसएसपी (SSP) गौरव तुरा यांनी मोठा खुलासा केला आहे. कॅनडातील गँगस्टर गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे तुरा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 3 गाड्यांनी मुसेवालाची थार थांबवली होती, असेही SSP तुरा यांनी म्हटले आहे.

मुसेवालाने आज बुलेटप्रुफ गाडी नेली नाही. त्यांच्यासोबत अंगरक्षकही नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर 9 एमएम पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी सिद्धू मुसेवाला स्वतः ड्रायव्हिंग करत होता. तसेच, लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल यांच्यातील गँगवॉरमुळे मूसवालाची हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

म्हणून पोलिसांना वाटते गँगची शक्यता - 
2021 मध्ये विकी मिददुखेडाची हत्या झाली होती. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच पकडले होते. शार्प शूटर सज्जन सिंग उर्फ ​​भोलू, अनिल कुमार उर्फ ​​लठ आणि अजय कुमार उर्फ ​​सनी कौशल, अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. यानंतर, पंजाब पोलिसांनी यांना तिहार कारागृहातून रिमांडवर घेतले होते.

या तिन्ही हल्लेखोरांनी चौकशीदरम्यान एका प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या हत्याकांडात सहभागी असल्याचे म्हटले होते.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पंजाबी  गायक सिद्धू मुसेवालाच होता. पोलिसांना संशय आहे, की विक्की मुद्दुखेडा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने आपल्या गुंडांच्या करवी सिद्धू मुसेवालाची हत्या केलेली असू शकते. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी हा लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा ऑपेट करतो.

Web Title: sidhu moosewala death case gangster residing canada goldy barad took responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.