विनयभंगाच्या आरोपातून गायक अभिजीत भट्टाचार्यची निर्दोष सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:20 PM2019-02-04T21:20:06+5:302019-02-04T21:21:37+5:30
मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
मुंबई - विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकलेला प्रसिद्ध गायक अभिषेक भट्टाचार्यविरोधात कोणताही पुरावा न आढळल्यामुळे पोलिसांनी त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
अंधेरीतल्या प्रसिद्ध हाॅटेल टिक्कामध्ये ७ ऑगस्ट २०१८ रोजी पीडित महिला तिच्या वडिलांसोबत जेवायला गेली होती. त्याचप्रमाणे हे हॉटेल अभिजीत भट्टाचार्य यांचं असल्याचं समोर आलं. यावेळी काही कारणावरून या महिलेचं हॉटेलचा मॅनेजर जस्कीत सिंग धामसोबत वाद झाले. यावेळी जस्कितनं शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला. तसेच अभिजीतने देखील फोन करून शिवीगाळ आणि अश्लील भाषेत गैरवर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला होता. त्यानुसार अंबोली पोलीस ठाण्यात धाम आणि अभिजीत विरोधात धमकी देणं आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना या गुन्ह्यात अभिजीत विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानुसार पोलिसांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार अभिजीतची निर्दोष मुक्तता करत पोलिसांनी धाम विरोधात गुन्हा कायम ठेवला आहे.