सिंगर फरमानी नाझचे कुटुंबीय चोरटे निघाले; बाप, भाऊ, भावोजी सळ्या चोर गँगचे मास्टरमाईंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:56 PM2022-11-08T12:56:13+5:302022-11-08T13:03:52+5:30
Singer Farmani Naaz : मेरठच्या सरधना पोलिसांनी आतापर्यंत फरमानीचा भाऊ आणि मेहुण्यासह आठ जणांना य़ाप्रकरणी अटक केली आहे, तर फरमानीचे वडील अद्याप फरार आहेत.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील प्रसिद्ध गायिक फरमानी नाझचा भाऊ अरमान आणि वडील आरिफ हे लोखंडी सळ्या चोरणाऱ्या गँगचे मास्टरमाईंड निघाले आहेत. मेरठच्या सरधना पोलिसांनी आतापर्यंत फरमानीच्या भावासह आठ जणांना य़ाप्रकरणी अटक केली आहे, तर फरमानीचे वडील अद्याप फरार आहेत. ज्याचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिनाभरापूर्वी मेरठमधील सरधना पोलीस स्टेशनच्या टेहरकी गावात बांधकाम सुरू असलेल्या टाकीवरील चौकीदाराला बांधून ठेवून काही लोकांनी अनेक क्विंटल लोखंडी सळ्या चोरल्या होत्या. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून, पोलिसांनी रविवारी खिर्वा मार्गावर एक पिकअप अडवली. आरोपींना पकडून पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनेक घरफोड्या केल्याच्या घटनांची कबुली दिली. सरधना पोलीस स्टेशनचे अधिकारी जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी टेहरकी गावात निर्माणाधीन पाण्याच्या टाकीच्या लोखंडी सळ्या चोरल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुज, शाकीर, मोनू रहिवासी पाबली खास, मोनू, इरशाद रा. द्वारकापुरी कंकरखेडा, फिरोज रा. टेहरकी, शारूक अली रा. जितौली आणि अरमान रा. मोहम्मदपूर लोहड्डा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अरमान हा प्रसिद्ध गायक फरमानी नाझचा भाऊ आणि इरशाद भावोजी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक फरमानी नाझचे वडील आणि सख्खा भाऊ अरमान हे या गँगचे मुख्य सूत्रधार आहेत. अरमानचे वडील आरिफ आणि मेहुणा इरशाद हे देखील चोरीच्या घटनांमध्ये एकत्र राहत असत. पोलीस फरमानीच्या वडिलांचा शोध घेत आहेत. तसेच त्याच्या टोळीतील इतर सदस्यांची माहिती घेतल्यानंतर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"