सिंगल बेडरूम, ८४ खाती, ८५४ कोटींची फसवणूक; इंजिनिअरचे कृत्य पाहून पोलिसही झाले अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:27 PM2023-10-15T12:27:48+5:302023-10-15T12:29:05+5:30
दोन आरोपींनी ८५४ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
बेंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनी मिळून ८५४ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.एका इंजिनिअर तरुणाने ही फसवणूक केली आहे. ८४ बँक खाती एक खोलीचे घर, आणि ८५४ कोटींची फसवणूक केली. बेंगळुरू पोलिसांनी ३५ वर्षीय एमबीए पदवीधर आणि ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला ताब्यात घेतले. या दोन तरुणांचे जाळे पाहून पोलिसही चक्रावले. या टोळीतील आणखी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
सावधान! कॉल रेकॉर्ड करणे महागात पडू शकते, जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणाले
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका २६ वर्षीय महिलेने बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीत महिलेने सांगितले की, अॅप आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे कमी गुंतवणुकीवर जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला थोडेफार कमावले, मात्र त्यांची ८.५० लाख रुपयांची फसवणूक झाली. बेंगळुरू पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि गेल्या २ वर्षांत फक्त एका बेडरूममधून ८५४ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचले.
फसवणूक कशी झाली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय एमबीए पदवीधर मनोज श्रीनिवास आणि ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर फणींद्र के. सुमारे दोन वर्षांपूर्वी, त्याने उत्तर बेंगळुरूमध्ये एकच बेडरूम भाड्याने घेतली आणि एक अज्ञात खासगी कंपनी उघडली. दोघांनी आणखी दोन तरुणांना कामावर ठेवले. त्यांना फक्त एकच काम देण्यात आले होते - ८ मोबाईल फोन रात्रंदिवस सक्रिय ठेवणे.
आरोपींनी ८ मोबाईल फोन २४ तास अॅक्टिव्ह ठेवले होते, जेणेकरून फसवणूक केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात फेक अकाउंटद्वारे ट्रान्सफर करता येतील. तसेच क्रिप्टोकरन्सी, गेमिंग अॅप्स आणि ऑनलाइन कॅसिनोमध्ये लावता येतील. बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचे बहुतांश पैसे ऑनलाइन कॅसिनो आणि गेमिंग अॅप्सद्वारे वळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला स्वतःचे गेमिंग अॅपही सुरू करायचे होते. काही रक्कम आंतरराष्ट्रीय बँक खात्यांमध्ये वर्ग करून विविध परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवली होती.
दुबई कनेक्शन
पोलिस तपासात दोन्ही आरोपींचे ८४ बँक खाती उघड झाली. या बँक खात्यांद्वारे फसवणूक केलेले पैसे गेमिंग अॅप्स, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन कॅसिनोमध्ये हस्तांतरित केले. यातील बहुतांश दुबईस्थित असून ते दोघेही या अॅप्सच्या ऑपरेटरला कधीच भेटले नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुबईस्थित ऑपरेटर्सचे नेटवर्क चिनी ऑपरेटरच्या संपर्कात होते किंवा दोघांमध्ये काही संबंध होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सर्व बँक खाती गोठवली आहेत.