डॉक्टर महिलेची फसवणूक, कॉलेजचे उपाधिष्ठातास सायन पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 21:27 IST2020-12-23T21:26:52+5:302020-12-23T21:27:19+5:30
Fraud : सायन पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे.

डॉक्टर महिलेची फसवणूक, कॉलेजचे उपाधिष्ठातास सायन पोलिसांनी केली अटक
मुंबई : सायन रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर महिलेची ५० लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश रामनारायण वर्माला (५४) सायन पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या सायन, केईएमसह विविध मेडिकल कॉलेजमध्ये सरकारी कोटयातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. सायन पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे.
मुंबई : सायन रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर महिलेची ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कॉलेजचे उप अधिष्ठाता राकेश रामनारायण वर्मला (५४) अटक pic.twitter.com/IpenPnrUax
— Lokmat (@MiLOKMAT) December 23, 2020