पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, परत आल्यावर त्याने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:03 PM2022-08-04T12:03:20+5:302022-08-04T12:04:52+5:30

Crime News : या प्रकरणाची माहिती देताना एएसपी आकाश पटेल म्हणाले की, गेल्या 30 तारखेला कासिम बेपत्ता झाल्याची सूचना त्याच्या कुटुंबियांनी दाखल केली होती.

Sister in law relationship with sisters husband murder police arrested two accused in Ghaziabad | पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, परत आल्यावर त्याने उचललं धक्कादायक पाउल

पती तुरूंगात जाताच मेहुणीने भाओजीसोबत ठेवले संबंध, परत आल्यावर त्याने उचललं धक्कादायक पाउल

Next

UP Crime News : गाजियाबादच्या मुरादनगरमधील शीतल कॉलनीमध्ये राहणारा 23 वर्षीय कासिम 5 दिवसांआधी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. बुधवारी कासिमचे कुटुंबिय अचानक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांना कासिमचा साळू आणि त्याच्या साथीदारावर हत्येचा संशय व्यक्त केला. ज्यानंतर पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत होते.

या प्रकरणाची माहिती देताना एएसपी आकाश पटेल म्हणाले की, गेल्या 30 तारखेला कासिम बेपत्ता झाल्याची सूचना त्याच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. ज्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. बुधवारी कासिमचे कुटुंबिय पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी संशय व्यक्त केला की, कासिमची हत्या त्याचा साळू आणि त्याच्या वकिल साथीदाराकडून करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी संशयीत आरोपींचा शोध घेणं सुरू केलं. पण अचानक दोन्ही आरोपींनी सरेंडर केलं.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. दोघांनी सांगितल्याप्रमाणे कासिमचा मृतदेह शोधण्यात आला. एएसपी आकाश पटेल यांनी सांगितलं की, मृत कासिमचा साळू रूखसाद काही दिवसांपूर्वी तुरूंगात होता. यादरम्यान कासिफचे आपल्या साळूच्या पत्नीसोबत म्हणजे मेहुणीसोबत अनैतिक संबंध झाले होते. सोबतच कासिमने त्याच्या सात महिन्यांच्या मुलीची हत्याही केली होती. ज्यामुळे त्यांच्यात वादही होता. त्यानंतर त्याने साथीदार वकिलासोबत मिळून कासिमच्या हत्येचा प्लान केला. पोलिसांनी दोघांनाही तुरूंगात पाठवण्याची तयार केली.

Web Title: Sister in law relationship with sisters husband murder police arrested two accused in Ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.