लग्नानंतर काही दिवसांतच दिराच्या प्रेमात पडली वहिनी, एकत्र येणे अशक्य झाल्यावर उचललं टोकाचं पाऊल आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 04:23 PM2021-08-10T16:23:52+5:302021-08-10T16:28:53+5:30
Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र...
पाटणा - अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाची खबर दिल्लीत राहत असलेल्या या महिलेच्या पतीला समजली आणि वादाला सुरुवात झाली. कुटुंबीयांनी या प्रेमप्रकरणाला विरोध कऱण्यास सुरुवात केली. मात्र एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्लेले हे दोघेही घरातून पळून गेले. मात्र दीड महिन्यापूर्वी गाव सोडलेल्या या जोडप्याला एकत्र राहणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत मरण्याची शपथ घेऊन स्टेशनवर येत विषप्राशन केले. यामध्ये या महिलेचा प्रियकर असलेल्या दिराचा मृत्यू झाला. तर ही महिला मृत्यूशी लढा देत आहे.
नालंदा जिल्ह्यातील हरनौत पोलीस ठाणे क्षेत्रातील हरनौत रेल्वे स्टेशनवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर आणि त्याच्या वहिनीने विषप्राशन केले. विषप्राशन केल्यानंतर दीर कुंदन कुमार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या वहिनीची प्रकृती गंभीर आहे. हरनौत येथील चक जेनाब गावातील बिंदेश्वरी यादव यांचा पुत्र राकेश कुमार याचा विवाह एक वर्षापूर्वी रहुईमधील अम्बा गावातील रहिवासी शबनम कुमारी हिच्याशी झाला होता. विवाहानंतर शबनमचा पती जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तिच्यात आणि तिच्या दिरामध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यातूनच ते घर सोडून पळून गेले.
दीड महिन्यांपूर्वी गाव सोडून गेलेले हे युगुल काही दिवसांपूर्वी हरनौत येथील रेल्वे स्टेशनवर परत आले. तिथे त्यांनी एकत्रच विषप्राशन केले. त्यात कुंदन याचा मृत्यू झाला. तर त्याची वहिनी असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या प्रकाराची कल्पना दोघांच्याही कुटुंबाला देण्यात आली आहे. एएसआय वीर बहादूर यांनी सांगितले की, एका जोडप्याने विषप्राशन केल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.