रेपच्या आरोपानंतर बॉयफ्रेन्ड गेला होता तुरूंगात, जामीनावर बाहेर येताच गायिका गर्लफ्रेन्डची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:36 PM2022-05-24T17:36:29+5:302022-05-24T17:37:04+5:30
Haryanvi Singer murder Case: दिल्ली पोलिसांनी परिवाराने लावलेले आरोप फेटाळले आहेत. पोलिसांचा दावा आहे की, १४ तारखेला परिवाराने तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
Haryanvi Singer murder Case: दिल्लीला राहणारी हरयाणवी गायिकेच्या हत्येची केस पोलिसांनी सॉल्व्ह केली आहे. मात्र, तिच्या परिवारातील लोकांनी पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावत पोलीस स्टेशन समोर तिचा मृतदेह ठेवून आंदोलन केलं. मृत गायिका दलित परिवारातील असल्याने भीम आर्मीचे लोकही पीडित परिवारासोबत विरोध प्रदर्शनात सहभागी होते. परिवाराकडून पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
दिल्ली पोलिसांनी परिवाराने लावलेले आरोप फेटाळले आहेत. पोलिसांचा दावा आहे की, १४ तारखेला परिवाराने तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आम्ही कारवाई करत २ आरोपी रवी उर्फ रोहित आणि मोहितला अटक केली आहे. मृत तरूणी रविला आधीपासून ओळखत होती. दोघे यूट्यूबवर गाणी आणि व्हिडीओ बनवत होते. तरूणी रवि विरोधात रेपचा आरोप लावला होता. ज्या आरोपात तो तुरूंगातही गेला होता. सध्या जामिनावर बाहेर आला होता. यादरम्यानच रविने अनिलसोबत मिळून हत्येचा प्लान केला. अजून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
हरयाणवी गायिकेच्या बहिणीचा आरोप आहे की, ११ मे रोजी मोहित उर्फ अनिलने गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी तिच्या बहिणीला बोलवलं होतं. त्याच रात्री बहिणीसोबत शेवटचं बोलणं झालं. तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की, ती नशेत होती. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. पुन्हा तिला फोन लागला नाही तेव्हा कुटुंबियांनी जाफरपूर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी त्यावेळी टाळाटाळ केली.
कुटुंबियांनी स्वत: केली चौकशी
मृत तरूणीच्या कुटुंबियांनी गुगल मॅपच्या माध्यमातून तिचं लोकेशन काढून पोलिसांना दिलं होतं. लोकेशन रोहतकच्या भीवानी रोडवरील गुलाटी ढाब्याचं होतं. कुटुंबियांनी स्वत: तेथील सीसीटीव्ही फुटेज काढून दिलं. त्यानंतरही दिल्ली पोलिसांनी काही कारवाई केली नाही. कुटुंबियांनी रवीवर संशय व्यक्त केला.
कुटुंबियांनी सांगितलं की, गाणं रेकॉर्डिंग दरम्यान रवि आणि मृत तरूणीची ओळख झाली. दोघांना लग्न करायचं होतं. पण मग रविने दुसऱ्या तरूणीशी लग्न केलं. याप्रकरणी पहिली केस सुरू होती. मृत तरूणीच्या बहिणीने सांगितलं की, त्या लोकांनी हत्या करून मृतदेह रोहतकच्या मेहममध्ये रस्त्याच्या शेजारी दफन केला होता. आम्हाला आमच्या बहिणीसाठी न्याय हवा आहे. दोषी पोलिसांवर कारवाई केली जावी. सध्या पोलीस याप्रकरणी पोस्टमार्टमची वाट बघत आहे.