अल्पवयीन मेहुणीसाठी भाओजी झाला सैराट; अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा असा काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:53 PM2021-11-29T13:53:03+5:302021-11-29T13:54:44+5:30
Murder Case : वास्तविक ही घटना धनबादच्या बलियापूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आरोपी उत्तम डे याने अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमासाठी पत्नी प्रतिमा देवीचा गळा चिरून खून केला.
झारखंडमधील कोयला नगर धनबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या मेहुणीच्या प्रेमात वेडे होऊन पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला हत्याकांडात वापरलेल्या शस्त्रासह अटक केली आहे.
वास्तविक ही घटना धनबादच्या बलियापूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आरोपी उत्तम डे याने अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमासाठी पत्नी प्रतिमा देवीचा गळा चिरून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोप असलेला उत्तम डे हा त्याची पत्नी प्रतिमा देवीसोबत राहत होता आणि त्याच दरम्यान तो त्याच्या पत्नीच्या अल्पवयीन बहिणीच्या प्रेमात पडला होता. आरोपीला आपल्या मेहुणीशी लग्न करायचे होते, त्यात त्याची पत्नी अडथळा ठरत होती. अशा स्थितीत उत्तम डे याने त्याच्या काही मित्रांसह पत्नीला आपल्या मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की, हत्येखोर आरोपी उत्तम डे याने मुन्ना उर्फ अविनाश हलदर आणि विकास राय उर्फ बाबा यांच्यासोबत कट रचला. यानंतर पत्नीला रस्त्याने घेऊन जात असताना विकास राय याने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कार थांबवली आणि मुन्नाने महिलेचे तोंड हाताने दाबून धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी इथेच थांबले नाहीत आणि त्यानंतरही त्यांनी पीडित महिलेवर चाकूने अनेक सपासप वार केले आणि महिलेचा मृत्यू झाल्यावर तिला जंगलात फेकून दिले आणि पळून गेले. २३ नोव्हेंबर रोजी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सत्य उघडकीस आले. खुनी पतीने आपला गुन्हा कबुल केला असून शस्त्र जप्त केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.