बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:16 PM2022-02-24T13:16:28+5:302022-02-24T13:16:52+5:30
Murder Case : बहिणीच्या प्रियकराला भेटण्यास नकार दिल्याचे आरोपी भावाने पोलिसांना सांगितले. यानंतर प्रियकराने शिवीगाळ केली, त्यामुळे त्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली.
बिहार - भागलपूरमध्ये बहिणीच्या अफेअरचा राग आल्याने भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. घटनेनंतर पकडले गेल्यावर आरोपी भावाने सांगितले की, तरुणाच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. बहिणीच्या प्रियकराला भेटण्यास नकार दिल्याचे आरोपी भावाने पोलिसांना सांगितले. यानंतर प्रियकराने शिवीगाळ केली, त्यामुळे त्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली.
काजू नावाच्या मुलाचे त्याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोपी मनोरंजन यादव याने म्हटले आहे. त्याने काजूला आपल्या बहिणीला भेटू नये म्हणून मनाई केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते. त्यानंतर त्याने त्याच्या तीन साथीदारांसह काजूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर कहलगांव गंगेच्या काठावर शिडीने मृतदेह गंगेत टाकण्यात आला. आपल्या बहिणीचे काजूसोबत अनैतिक संबंध होते, त्यास मनोरंजन आणि त्याचे कुटुंबीय विरोध करत होते, अशी कबुली मनोरंजनने पोलिसांकडे दिली आहे. पण काजू राजी होत नव्हता. त्यानंतर त्याने काजूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
गमछाने त्याचा गळा दाबून खून केला, नंतर मृतदेह गंगेत फेकून दिले
प्रथम मनोरंजनने काजूला विश्वासात घेतले, त्यानंतर जयराम यादव आणि त्याचे साथीदार दिवाकर आणि रुपेश यांनी काजूला सांगितले की त्याची बहीण त्याला भेटायला थांबली आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी जीरोमाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळपूर येथून काजू कहलगांवात पोहोचले. तेथे उपस्थित असलेल्या सर्व आरोपींनी प्रथम त्याचा गमछाने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह गंगेत फेकून दिला.
मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर काजूचे वडील अशोक यादव यांनी 7 फेब्रुवारी रोजी झिरोमेल पोलिस ठाण्यात काजू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर, भागलपूरच्या एसएसपीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि जीरोमाइल पोलिस स्टेशनसह तिलकमांझी आणि सबूर पोलिस स्टेशनच्या एसएचओची टीम तयार करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम मुलीचा चुलत भाऊ दिवाकर याला त्याच्या घरातून अटक केली आणि त्यानंतर या घटनेचा सूत्रधार मनोरंजन याला मथुरापूर येथून अटक केली. जीरोमाइल पोलिस स्टेशनचे एएसआय सिकंदर यादव यांनी सांगितले की, सर्व आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.