वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:50 PM2024-10-16T13:50:35+5:302024-10-16T13:51:08+5:30

घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले.

Sivakumar's firing by practicing in Varat; Criminals communicate via Snapchat, Insta | वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

मुंबई : उत्तर प्रदेशात वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. शिवकुमार गौतमने काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता. त्याच सरावावर त्याची निवड केली. त्यानेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात समोर येत आहे. कटातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे संवाद साधत असल्याचे चौकशीत समोर आले. चॅटिंगसाठी स्नॅपचॅट, तर इन्स्टाद्वारे व्हिडीओ कॉल करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

हत्याप्रकरणात गुन्हे शाखेकडून शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि मोहम्मद जिशान अख्तरचा शोध सुरू आहे. शुभम याच्या २४ सप्टेंबरपर्यंत हालचाली दिसून येत आहेत. शुभमने आर्ट्समधून प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले आहे, तर प्रवीण लोणकर हा दहावी आहे. शुभमला देशसेवेसाठी २०१८मध्ये आर्मीत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्याच वर्षी आर्मीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या कारणामुळे संधी हुकली. त्याचदरम्यान देशसेवेच्या नावाखाली तो बिष्णोई टोळीचा ‘बाजरा’शी त्याची भेट झाली. त्याने व्हिडीओ कॉलद्वारे लॉरेन्स बिष्णोईशी बोलणे करून दिले. त्यानुसार, तो नेपाळसह अझरबैजान या ठिकाणी ट्रेनिंगसाठीही जाऊन आल्याचे समोर येत आहे. शुभमने बलात्काऱ्यांच्या हत्येसाठी कील द रेपिस्ट नावाचा ग्रुपदेखील बनविला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांच्या चौकशीत समोर येत आहे. 

तीन तास घटनास्थळावर
घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले.
 

Web Title: Sivakumar's firing by practicing in Varat; Criminals communicate via Snapchat, Insta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.