बालविवाह प्रकरणी सहा जणांना अटक, डोंबिवलीतील सागर्ली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 10:25 PM2020-07-02T22:25:35+5:302020-07-02T22:38:29+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे मानपाडा पोलिसांनी नवऱ्यासह त्याचे आणि नवरीकडील नातेवाईक अशा एकूण सहा जणांना गुरूवारी अटक केली.
डोंबिवली: येथील पुर्वेकडील सागर्ली परिसरात 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि 26 वर्षांचा तरुण यांचा बालविवाह त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुपचूप संपन्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे मानपाडा पोलिसांनी नवऱ्यासह त्याचे आणि नवरीकडील नातेवाईक अशा एकूण सहा जणांना गुरूवारी अटक केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे यांना निनावी फोनद्वारे बालविवाहाची महिती मिळाली होती. त्यांनी ती माहिती अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह आणि डोंबिवलीतील रहिवासी अॅड. तृप्ती पाटील यांना दिली. यात डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका सोसायटीच्या घरात बालविवाह होणार असल्याबाबत तसेच अल्पवयीन मुलगी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे, अशी माहिती पाटील यांना मिळाली.
पाटील यांनी याबाबत तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्याला कळवले. स्वत: अॅड. पाटील आणि अंनिसचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रा. प्रवीण देशमुख आणि परेश काठे यांच्यासह पोलिस अधिका-यांनी केलेल्या शोध मोहीमेत अपेक्षित असलेले ठिकाण सापडले. परंतू पोलीस आणि अंनिस कार्यकर्त्यांची धाड पडायच्या पूर्वीच सागर्ली गावातील एका सोसायटीतील एका घरात बालविवाह संपन्न झाला होता.
दरम्यान, मानपाडा पोलिसांनी बालविवाह पार पाडण्यात जबाबदार असलेल्या नवरदेव सतीश जाधव याच्यासह त्याचे नातेवाईक आणि नवरी मुलीकडचे नातेवाईक अशा सहा जणांना अटक करून त्यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निनावी फोनद्वारे माहिती देणा-याने संपूर्ण पत्ता दिला नव्हता म्हणून आम्हाला तत्काळ लग्नाचे ठिकाण शोधता आले नाही अन्यथा बालविवाह रोखण्यात यश आले असते, अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली.
आणखी बातम्या...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द
जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली
टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...
'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स
भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद