हुक्का पार्टी प्रकरणी सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:56 IST2020-09-22T23:56:25+5:302020-09-22T23:56:28+5:30
भार्इंदरची घटना : वकिलासही केली अटक

हुक्का पार्टी प्रकरणी सहा जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस एका खाजगी जागेत बेकायदा हुक्का पार्टी करणाऱ्या एका वकिलासह एकूण सहा जणांना भार्इंदर पोलिसांनी छापा घालून अटक केली. विशेष म्हणजे या वकिलास पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर गुन्ह्यात मदत केली म्हणून प्रशस्तिपत्र दिले होते. समाज माध्यमांवरही वकिलाने स्वत:चे पोलीस, नेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगर परिसरात नियमित हुक्का पार्टी चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भार्इंदर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने सोमवारी रात्री या ठिकाणी छापा मारला असता तेथे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून अॅड. हर्ष राजेश शर्मा (२९), संजय बुदराज मुनोत (३३), पीयूष मित्तल (२८), भवरसिंह परमार (३२), अक्षय कोया (२६), राजदीप विमल दास (२२) या सहा जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणी कायद्याने बंदी असलेल्या तंबाखूजन्य हुक्क्याची पार्टी सुरू होती. ही जागा कुणाच्या मालकीची व कोण सांभाळतो याची माहिती पोलीस घेत आहेत. शर्मा याला सायबर गुन्ह्यात मदत केली म्हणून अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, नयानगरचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी प्रशस्तिपत्रक दिले आहे.