पिंपरी शहरात दोन दिवसांत घरफोडीचे सहा गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:44 AM2019-03-23T02:44:03+5:302019-03-23T02:44:16+5:30
पिंपरी शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली.
पिंपरी : शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली.
दिघीतील साई पार्क येथील गुरुदत्त कॉलनी येथे घडलेल्या घटनेत मधुकर मारुती शिंदे (वय ५८) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, टीव्ही असा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.
यासह हार्दिक शैलेश जानी (वय ३५, प्राधिकरण, निगडी) यांचे आकुर्डीतील प्रेस्टीज प्लाझा बिल्डिंग नंबर २ येथील ज्योती सेल्स अॅन्ड सर्व्हिस सेंटर नावाचे शॉप चोरट्यांनी फोडले. शॉपचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.
तसेच आकुर्डी गावातील मेडिकलचे दुकान चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी मोहम्मद मोईनुद्दीन इमामबक्ष शेख (वय २५, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरटा मेडिकल दुकानाचे शटर व लॉक उचकटून २२ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. तसेच बावधन खुर्द येथील स्टेट बँकेच्या मागील धु्रव बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत शिरलेल्या चोरट्याने बेडरुममधील लाकडी कपाटातील २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नंदकिशोर विश्वनाथ कुमार (वय ७०) यांनी फिर्याद दिली आहे.
ताथवडेतील कार्तिकेन बिल्डिंगवर असलेल्या मोबाइल फोन टॉवरच्या ठिकाणी असलेल्या केबिनचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा बॅटऱ्या चोरल्या. याप्रकरणी हरिबा दत्तू राजाराम (वय ५७, रा. जय गणेश व्हीजन, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.