बँक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सहा लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 06:11 PM2021-12-10T18:11:45+5:302021-12-10T18:12:24+5:30

Crime News : याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा सोलापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Six lakh embezzlement in bank employees' provident fund! Filed a crime | बँक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सहा लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

बँक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सहा लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

Next

उदगीर (जि. लातूर) : येथील भाऊसाहेब सहकारी बँक लि. (जुने नाव यशवंत अर्बन को. ऑप बँक लि. शाखा उदगीर ) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या तब्बल सहा लाखांच्या रकमेचा अपहार करत फसवणूक केल्याची घटना उदगीर येथे घडली. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा सोलापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील मुक्कावार चौकात असलेल्या भाऊसाहेब सहकारी बँक लिमिटेड बँकेतील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याचे काम सोलापूर येथील एका एजन्सीकडे देण्यात आले होते. त्या एजन्सीमध्ये काम करणाऱ्या जगदीश आप्पाराव कुलकर्णी याने १५ डिसेंबर २०१८, एप्रिल २०१९, मे २०१९ आणि जुलै २०१९ या चार महिन्याच्या भविष्य निर्वाह निधीची ५ लाख ८९ हजार ५५३ रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा न करता उदगीर येथील बँकेचा विश्वासघात केला. तर या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. 

याबाबत उदगीर येथील भाऊसाहेब सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत माणिकराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उदगीर पोलीस करीत आहेत.

Web Title: Six lakh embezzlement in bank employees' provident fund! Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.