छर्रा गँगमधील आणखी सहा सराईत गुन्हेगारांना अटक!
By अनिल गवई | Published: March 28, 2023 01:00 PM2023-03-28T13:00:35+5:302023-03-28T13:01:10+5:30
यापूर्वी पथकाने शेगाव येथून टोळीतील छर्रा गँगमधील तिघांना अटक केली होती.
खामगाव: येथील गांधी चौकात उभ्या दुचाकीतून साडेसहा लक्ष रुपयांची चोरीचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता आणखी सहा सराईत गुन्हेगारांना गुजरात येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, यापूर्वी पथकाने शेगाव येथून टोळीतील छर्रा गँगमधील तिघांना अटक केली होती.
गुजरात येथून दुचाकी, चारचाकीने येऊन एखाद्या शहरात मुक्काम ठोकून चोरी करण्याची पद्धत असलेल्या या आरोपींनी गांधी चौकातून एका दुचाकीच्या डिक्कीतून साडेसहा लाख रूपये लंपास केले होते. या चोरीचा छडा लावताना शेगावातून यापूर्वी तीन आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. यातील तीन आरोपींना शनिवारी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने उपरोक्त तिघांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात गाठले. अहमदाबाद येथील छर्रा नगर, कुबेर नगर, पावागड, वडोदरा, गोध्रा मधील डाकाेर येथे शोध घेऊन पथकाने शिताफिने त्यांचा पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना बुलढाणा येथे आणण्यात आले. आरोपींमध्ये सन्नी सुरेंद्र तमांचे (३५), दीपक धीरूभाई बजरंग (४०), मयूर दिनेश बजरंग (३९), राजेश ऊर्फ राकेश देवची तमांचे (४९), रवी नारंग गारंगे (५५), मुन्नाभाई मेहरूनभाईं इंदरेकर (६०) रा. छर्रा नगर अहमदाबाद गुजरात अशी आरोपींची नावे आहे.
पथकाचे परिश्रम यशस्वी
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, खामगाव अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, बुलडाणा अपर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे , सपोनि. राहूल जंजाळ, विलासकुमार सानप, पोउपनि संदीप सावले पोलीस अंमलदार गणेश किनगे, शरद गिरी, राजकुमार राजपूत, गजानन दराडे, केदार फाळके, अजीज परसूवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, वौभव मगर, विजय सोनोने, सुरेश भिसे, युवराज राठोड, गजानन गोरले, जगदेव टेकाळे, सतिष जाधव, दिगांबर कपाटे, सचिन जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजु आडवे, कैलास ठोंबरे यांनी यशस्वी केली. तपास पथकात सहा. पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, पो.ना. गणेश पाटील, पो.ना. युवराज राठोड, पो. कॉ. गजानन गोरले, पो.कॉ. विजय सोनोने, यांचा समावेश होता.
विविध गुन्ह्याचा तपास
खामगाव शहर पोलीस स्टेशनसह पशि्चम विदर्भातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करण्यात पोलीस यशस्वी झालेत. यात खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल भादंवि कलम ३७९, वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशनमधील भादंवि कलम ३७९, यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल ३९२, ३४ आणि अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशनमधील भादंवि कलम ३७९ या गुन्ह्याचा समावेश असून महाराष्ट्रातील इतर गुन्ह्याचाही तांत्रिक तपास यशस्वी होणार असल्याचे समजते.