आमदार रईस शेखसह सहा जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:42 AM2020-06-03T00:42:30+5:302020-06-03T00:42:36+5:30
तोंडावर मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता बेकायदा जमाव जमवला होता. आणि शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला अधिकाऱ्याबाबत केलेले चुकीचे वक्तव्य तसेच लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शेखसह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे चौकशी करून, नोटीस देत सोडण्यात आले आहे. नागपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. २६ तारखेला रात्री १२ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत नागपाडा जंक्शन परिसरात आझमी यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे का दिली नाही म्हणून आझमी यांनी आंदोलन छेडले.
तोंडावर मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता बेकायदा जमाव जमवला होता. आणि शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनदरम्यान लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन, कोरोनाचे प्रादुर्भाव वाढेल असे कृत्य, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, सह कलम २, ३, ४ साथीचे रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत अबू आझमी, आमदार रईस शेखसह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्याविरोधात निदर्शने केली व पोलीस अंमलदाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप.