खून प्रकरणातील संशयित सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:00 PM2019-12-15T18:00:46+5:302019-12-15T18:01:09+5:30
पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांचा खून झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती.
लातूर - रेणापूर तालुक्यातील पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांच्या खून प्रकरणी संशयित सहा आरोपींना लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रेणापूरच्या पोलीस पथकाने रविवारी सकाळी पकडले.
पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांचा खून झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी नानासाहेब उपाडे, त्याचे सहकारी गणेश उपाडे, आकाश उपाडे, दुर्गेश पाडोळे, चरण उपाडे, नेताजी उपाडे (सर्वजण रा़ पळशी) यांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, अहमदपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, पोनि. गोरक दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोनि. सुनील रेजितवाड, पोउपनि. लक्ष्मण कोमवाड, रेणापूरचे एपीआय माचेवाड, पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड, अनंत बुधोडकर, गौतम घाडगे यांची दोन पथके विविध भागात रवाना झाली होती़ दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा चौघांना तर रविवारी सकाळी दोघा संशयित आरोपींना लातूर व पाटोदा येथून पोलिसांनी पकडले असल्याची माहिती रेणापूरचे पोनि़ गोरख दिवे यांनी दिली.