बापरे! खाण्याची वस्तू समजून स्फोटक पदार्थ खाल्ला; ६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:55 PM2020-06-11T17:55:05+5:302020-06-11T17:55:32+5:30

अन्न समजून या मुलाने हा स्फोटक पदार्थ खाल्ला, ३ लोक कावेरी नदीजवळ मासे मारण्यासाठी हे स्फोटक पदार्थ घेऊन पोहचले होते अशी माहिती मिळत आहे

Six Year Old Boy Dies After Consume Explosive In Tamilnadu | बापरे! खाण्याची वस्तू समजून स्फोटक पदार्थ खाल्ला; ६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

बापरे! खाण्याची वस्तू समजून स्फोटक पदार्थ खाल्ला; ६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

googlenewsNext

तिरुचिरापल्ली – अलीकडेच केरळच्या कोल्लम जिल्ह्यात एका हत्तीणीचा स्फोटक पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला होता, या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात होता, आता तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात एका मुलाने स्फोटक पदार्थ खाल्ल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या ६ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अन्न समजून या मुलाने हा स्फोटक पदार्थ खाल्ला, ३ लोक कावेरी नदीजवळ मासे मारण्यासाठी हे स्फोटक पदार्थ घेऊन पोहचले होते अशी माहिती मिळत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आसपासच्या परिसरात लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गावातील ३ लोकांनी मासे पकडण्यासाठी स्फोटकं आणली होती, ते जिलेटिन स्फोटक घेऊन एका मित्राच्या घरी गेले, त्याठिकाणी एक मुलगा खेळत होता,  खाण्याची वस्तू समजून या मुलाने स्फोटक तोंडात घेऊन चावले, त्यानंतर काही क्षणातच स्फोट झाला.

या स्फोटामध्ये मुलगा गंभीररित्या जखमी झाला. गोंधळलेल्या परिस्थितीत तेथील लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलिसांना माहिती न देताच मुलाच्या वडिलांनी आणि मित्रांनी मिळून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा झाल्याने पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यासोबत देशी बॉम्ब बनवणाऱ्या लोकांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

काय झालं होतं केरळमध्ये?

अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात रानावनात फिरत होती. या हत्तीणीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिल्याचं सांगितलं जात होतं. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. त्यानंतर या हत्तीणीनं चुकून हा स्फोटक पदार्थ खाल्ला असावा असं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांनी सांगितलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मनातील कोरोनाची भीती काढून टाका; ८३ जिल्ह्यांच्या सर्व्हेतून मिळाली समाधानाची बातमी

भारताविरुद्ध चीनचा माईंडगेम! लडाख सीमेवर आणल्या अत्याधुनिक ‘बाहुबली तोफ’

त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

Web Title: Six Year Old Boy Dies After Consume Explosive In Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस