सहाव्या पत्नीने शारीरिक संबंधांना नकार दिला; हैवान पती सातवी पत्नी घेऊन आला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 01:57 PM2021-01-25T13:57:02+5:302021-01-25T13:58:05+5:30
Crime News: जेव्हा लोक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना व्हायरसवर रामबाण उपाय शोधत होते, तेव्हा अयूब डिगिया त्यांच्यासाठी सातवी पत्नी शोधत होते. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. सहाव्या पत्नीने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. हृदयविकार, मधुमेह आणि अन्य आजार असलेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीने सातवे लग्न केले आहे. सहाव्या पत्नीने शारीरिक संबंधांना नकार दिल्याने गरज म्हणून सातवे लग्न केल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.
महत्वाचे म्हणजे या व्यक्तीला रात्रीची झोपही लागत नाही. सहावी पत्नी त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. पत्नीने नकार दिल्यानंतर त्याच्या हृदयात सारखे दुखू लागल्याचे तो सांगत होता. जेव्हा लोक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना व्हायरसवर रामबाण उपाय शोधत होते, तेव्हा अयूब डिगिया त्यांच्यासाठी सातवी पत्नी शोधत होते. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. सहाव्या पत्नीने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुरत जिल्ह्यातील कपलेठा गावात हा अयूब डिगिया राहतो. त्याने सप्टेंबर 2020 मध्ये त्याने सहावे लग्न केले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनी डिसेंबरमध्ये दोन्ही वेगळे झाले. या सहाव्या पत्नीने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. अयूबने सांगितले की तिने तिच्यासोबत झोपायला दिले नाही. कोरोना व्हायरसचे कारण सांगून ती वेगळी झोपत होती. मला हृदयविकार, मधुमेह आणि अन्य आजार आहेत. मला एका पत्नीची गरज आहे जी माझ्यासोबत संबंध ठेवू शकेल.
अयूब यांची पहिली पत्नी जिवंत आहे. तिला 20 ते 35 वर्षांची मुले आहेत. ती याच गावात राहते. अयूबने सहावे लग्न 42 वर्षीय महिलेसोबत केले. या सहाव्या पत्नीला लग्न केल्यानंतर आधीच्या पाच लग्नांची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यात तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आधीच्या लग्नांबाबत अंधारात ठेवून फसवणूक करत लग्न केल्याचा आरोप तिने केला आहे. आता मला सोडून अयूब सातव्या पत्नीसोबत राहत आहे. मला गावकऱ्यांनी सांगितले की, तो असाच काही काळ महिलांसोबत राहतो आणि त्यांना सोडून देतो.
डिसेंबरमध्ये अयूबने सहाव्या पत्नीला तिच्या बहिणीच्या घरी आणून सोडले. तसेच बाहेर जात असल्याचे त्यांना सांगितले. परत आल्यानंतर तिला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, तो परत आलाच नाही. चौकशी केल्यानंतर त्याने सातवे लग्न केल्याचे समोर आले, असे महिलेच्या वकिलाने सांगितले.