मृतदेहासोबत रात्रभर झोपला दिव्यांग, धक्कादायक घटना काय ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:11 PM2022-01-02T21:11:23+5:302022-01-02T21:11:43+5:30
Crime News : आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत आणि तुरुंगात पोहोचले.
दिल्लीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाजवळ झोपले. दिल्ली पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. खरे तर खुनी हा अपंग असून पोलिसांना त्याच्यावर खुनाचा संशय येऊ नये या उद्देशाने तो मृतदेहाजवळ झोपला होता. मात्र आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत आणि तुरुंगात पोहोचले.
दिल्ली पोलिसांना १ जानेवारी रोजी सुभाष नगर परिसरातील सूर्या हॉटेलजवळ एक पुरुषाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की, रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी होती आणि जवळ एक मृतदेह पडलेला होता. मृतदेह पाहिल्यानंतर मृतदेहावर चाकूने अनेक वार केल्याचे दिसून आले.
दिव्यांगास हत्येप्रकरणी अटक
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला, तपासात मृताचे नाव चंदन असून तो सुभाष नगर परिसरात राहतो, असे पोलिसांच्या पथकाला समजले, चंदन त्याच्या दोन मित्रांसह राजौरी गार्डनमधील अन्सल प्लाझा मॉलमध्ये नवीन वर्ष साजरे करत होता. आरोपींची चौकशी केली असता मित्रांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सूर्या हॉटेलबाहेर हा मृत चंदन सिगारेट घेण्यासाठी दुकानात गेला होता.
या मुद्द्यावरून पोलिस पथकाने तपास पुढे नेला. त्या रात्री मृत चंदनची भेट रस्त्याने भीक मागून जाणार्या एका ६५ वर्षीय वृद्ध दिव्यांगाशी झाली होती, असे स्थानिक माहितीगारांकडून समजले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंदन आणि संतोष दोघेही दारूच्या नशेत होते, त्यामुळे दोघांचेही दारूच्या नशेत एखाद्या गोष्टीवरून वाद आणि वादाचे रुपांतर मारामारीत झाले.
नशेत मृत आणि दिव्यांग यांच्यात वाद झाला
दरम्यान, विनोद नावाचा २० वर्षीय तरुणही स्कूटीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सांगितले की, विनोद हा दिव्यांग संतोषची देखभाल करतो. विनोदला पाहताच संतोष लगेच त्याच्याकडे पोहोचला. मात्र त्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चंदनने संतोषला शिवीगाळ करणे सुरूच ठेवले आणि त्याने दिव्यांग संतोषलाही मारहाण केली. त्यानंतर विनोद आणि संतोष यांची चंदनसोबत हाणामारी झाली आणि त्यानंतर आरोपी विनोद आणि संतोष यांनी चंदनवर चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली
चाकू लागल्याने चंदनचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी विनोद ताबडतोब स्कूटी घेऊन त्याच्या घरी गेला, मात्र दिव्यांग रात्रभर मृतदेहासोबत पडून होता, कारण त्याला दोन कारणांमुळे पोलिसांना संशय येणार नाही असे वाटले, एक तर तो शारीरिक दुर्बल आहे आणि दुसरा घटनास्थळावरून पळून जाऊ शकत नाही. मात्र संतोषची ही युक्ती पोलिसांसमोर चालली नाही आणि खुनाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी संतोष आणि विनोदला अटक केली असून खुनात वापरलेला चाकू जप्त केला आहे.