चिमुकल्याचं अपहरण करणारे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 02:28 PM2019-06-12T14:28:48+5:302019-06-12T14:29:51+5:30
सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
ठाणे - भिवंडी येथून एक मुलाचे अपहरण करणाऱ्या रोहित प्रदीप कोटेकर आणि सूरज सोनी या दुकलीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच अपहृत मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आणि पोलिसांनी मुलाला पालकांकडे सोपवलं आहे. अपहृत मुलाचं नाव आशिक चंदुल हरजन असे आहे. ते दोघे रेकॉर्डवरील वाहन चोर गुन्हेगार असून त्यांनी झालेले कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.उत्तरप्रदेश येथील फैजाबादमध्ये राहणारे चंदूल रामप्यारे हरिजन काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि १ वर्षीय मुलासह रोजगाराच्या शोधात भिवंडीत आले होते. राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धामणकर नाका येथे उड्डाणपुलाखाली आपले बस्तान बसवले. त्यानतंर चंदूल यांनी बूटपॉलिशचा रोजगार सुरु केला. या उड्डाणपूलाखाली हरियन परिवार २ जूनला रात्री झोपले असताना अचानक एक अज्ञाताने पत्नी रेणू यांच्या कुशीतून बाळाला उचलले. त्याच्या अंगावर गोणपाट लपेटून त्याचे अपहरण केले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास रेणूला जाग आली. त्यावेळी तिला कुशीतील बाळ गायब असल्याचं कळलं. तिने आजूबाजूला शोधाशोध केली असता तिला १ वर्षाचा आशिष कुठेही दिसला नाही. त्यानंतर हरियन दाम्पत्यांने भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारानुसार पोलिसांनी भिवंडी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना बाळ पळवून नेत असताना तीनजण दिसले. त्यानंतर एका बातमीदाराकडून पोलिसांना त्या आरोपींचा फोन नंबर मिळाला. फोन नंबरच्या आधारे पोलिसांना ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले असल्याचं कळालं. नंतर भिवंडी पोलिसांनी उत्तप्रदेशातील गोरखपूर या ठिकाणाहून एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चिमुरड्या आशिषची सुटका केली.