खळबळजनक! फ्लॅटमधून आला दुर्गंध, दरवाजा उघडून पाहतात तर बहिणींचे कुजलेले मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:49 PM2020-04-16T16:49:35+5:302020-04-16T16:50:42+5:30

ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील आहे.

The smell of came from the flat, the door open and the dead bodies of two sisters pda | खळबळजनक! फ्लॅटमधून आला दुर्गंध, दरवाजा उघडून पाहतात तर बहिणींचे कुजलेले मृतदेह 

खळबळजनक! फ्लॅटमधून आला दुर्गंध, दरवाजा उघडून पाहतात तर बहिणींचे कुजलेले मृतदेह 

Next
ठळक मुद्देपोस्टमार्टमनंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. घटनास्थळावरून सुसाइड नोटही सापडली नाही.दोघांच्याही गळ्याला दोरीचे फास होते आणि मृतदेह कुजलेले होते.

नवी दिल्ली - घरा मालकाने शेजारचे आपले घर भाड्याने राहण्यासाठी दोन बहिणींना दिले होते. भाडे घेण्यासाठी पाठविले तेव्हा तेथील रहिवाशांनी त्याला सांगितले की आतून दुर्गंध येत आहे. नंतर पोलिसांना बोलविण्यात आले. फ्लॅटच्या आतलं दृश्य भयानक होतं. बंद फ्लॅटमध्ये दोन मुलींचे दोन कुजलेले मृतदेह पडले होते. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बारा येथील रहिवासी राजेश पांडे हे दिल्ली बीएसएफमध्ये तैनात आहेत. कानपूरच्या पनकी पोलिस स्टेशन भागात त्यांचा एक फ्लॅट आहे, चार महिन्यांपूर्वी ओयोमार्फत या दोन महिलांनी त्यांचं घर भाड्याने घेतले होते. या दोघी बहिणी होत्या. मालक महिन्याला भाडे घेण्यासाठी कोणालातरी फ्लॅटवर पाठवत असे.
बुधवारी देखील घरमालक भाडे वसूल करायला गेला असता तेथील रहिवाशांनी त्याला सांगितले की, काही दिवसांपासून फ्लॅटमधून दुर्गंध येत आहे आणि सदर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन मुली फार काळ दिसल्या नाही. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिसांना माहिती मिळाली आणि फॉरेन्सिकची टीमच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांचे पथक आत गेले आणि तेथील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. दोन्ही मुलींचे मृतदेह खोलीत जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या गळ्याला अडकलेला दोरखंड खोलीतील खिडकीशी बांधला होता. दोघांच्याही गळ्याला दोरीचे फास होते आणि मृतदेह कुजलेले होते.

मृतदेहाची अवस्था पाहून हे प्रकरण आत्महत्या झाल्याचे दिसत होते. परंतु खोलीत पडलेला मृतदेह आणि फक्त दोन हात उंचावरील खिडकीतून लटकून ठेवल्याने आत्महत्या होऊ शकते का संशय पोलिसांना आहे. 

आभा शुक्ला आणि रेखा शुक्ला असं या दोन बहिणींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. त्याचवेळी, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून जप्त केलेल्या सर्व गोष्टींचा बारकाईने परीक्षण केला जाईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. घटनास्थळावरून सुसाइड नोटही सापडली नाही.

या घटनेची माहिती देताना कानपूर पश्चिम एसपी अनिल कुमार यांनी सांगितले की, फ्लॅटच्या आत दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. दरवाजा आतून बंद होता. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. सापडलेल्या साहित्याच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोस्टमार्टमनंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. 

 

Web Title: The smell of came from the flat, the door open and the dead bodies of two sisters pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.