दाबोळी विमानतळावर ९ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:07 PM2019-03-10T22:07:28+5:302019-03-10T22:08:40+5:30
शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशावर कस्टम विभागाला संशय आल्याने त्याची येथे झडती घेतली असता त्यांनी ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले.
वास्को - शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशावर कस्टम विभागाला संशय आल्याने त्याची येथे झडती घेतली असता त्यांनी ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. दाबोळी विमानतळावर पकडण्यात आलेले हे तस्करीचे सोने ‘पेस्ट’ पद्धतीने आणल्याचे कस्टम अधिकाऱ्यांना तपासणीच्या वेळी स्पष्ट झाले आहे.
रविवारी (दि.१०) दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील प्रवाशांची येथे कस्टम अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत असताना एका प्रवाशाच्या हावभावा वरून त्यांना संशय निर्माण झाला. वेळ न काढता कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला बाजूला घेऊन त्याची झडती घेण्यास सुरवात केली. यावेळी त्यांने अंतरवस्त्राच्या आत एका पाकीटात ‘पेस्ट’ पद्धतीने तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्वरित कारवाई करून सदर सोने नंतर कस्टम कायद्याखाली जप्त करण्यात आले. कस्टम अधिका-यांनी जप्त केलेले सदर तस्करीचे सोने ३०४ ग्राम वजनाचे असल्याची माहीती देऊन याची एकूण किंमत ९ लाख १९ हजार ४७८ असल्याचे कस्टम अधिकाºयांनी सांगितले. हे सोने कुठे नेण्यासाठी आणले होते व सदर तस्करीचे सोने कोणी आणायला लावले होते याबाबत कस्टम अधिकारी विविध मार्गाने सध्या तपास करीत आहेत.
दरम्यान दाबोळी विमानतळावर ‘पेस्ट’ पद्धतीने तस्करीचे सोने आणण्याचा प्रकार वाढला असल्याचे मागच्या काही काळापासून कस्टम अधिकाºयांनी केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. चार दिवसापूर्वी (६ मार्च) कस्टम अधिकाºयांना विदेशातून आलेल्या एका प्रवाशावर संशय आल्याने त्याची झडती घेतली असता त्यांने ‘पेस्ट’ पद्धतीने आणलेले ५९० ग्राम वजनाचे तस्करीचे सोने पकडले होते. ह्या सोन्याची किंमत १८ लाख रुपये असून मागील काही काळात प्रवाशी ‘पेस्ट’ पद्धतीने तस्करीचे सेने दाबोळी विमानतळावर आणत असल्याचे दिसून आले आहे.
ह्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर २ कोटी ६२ लाख रुपयांचे तस्करीचे सोने करण्यात आले जप्त
१ एप्रिल २०१८ ते अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाºयांनी विदेशातून आलेल्या विविध प्रवाशांवर कारवाई करून २ कोटी ६२ लाख ७४ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. तसेच ह्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजून पर्यंत विविध प्रवाशांकडून बेकायदेशीर रित्या नेण्यात येत असलेली ७५ लाख १४ हजार रुपयांची विविध विदेश चलने सुद्धा जप्त केली आहेत. ३१ मार्च पर्यंत (ह्या आर्थिक वर्षात) दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकारी आणखीन केवढ्या कारवाई करतात हे येणाºया काळातच स्पष्ट होणार