४३ कोटींचे तस्करीचे सोने जप्त; ८ जणांना अटक, आरोपी सांगलीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:58 AM2020-08-31T06:58:19+5:302020-08-31T06:59:07+5:30
दिब्रूगढ-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने शुक्रवारी नवी दिल्ली स्टेशन पोहोचलेल्या आठ जणांना रोखून झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे सोन्याच्या ५४० विटा आढळल्या.
नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यान्मामधून तस्करीमार्गे भारतात आणलेले ४३ कोटींचे किमतीचे ८३.६ किलो सोने जप्त केले. याप्रकरणी नवी दिल्ली स्टेशनवर आठ जणांना अटक केली. सर्व आरोपी महाराष्टÑातील सांगली जिल्ह्यातील आहेत.
डीआरआयने म्हटले आहे की, दिब्रूगढ-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने शुक्रवारी नवी दिल्ली स्टेशन पोहोचलेल्या आठ जणांना रोखून झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे सोन्याच्या ५४० विटा आढळल्या. हे सोने त्यांनी खास शिवून घेतलेल्या कपड्यात दडविले होते. बनावट आधार कार्डाने हे प्रवास करीत होते. या सोन्याच्या विटांवर विदेशी चिन्हे होती. मणिपूरमधील मोºहे येथील आंतरराष्टÑीय सीमेवरून मान्मामधून तस्करीने हे सोने भारतात आणण्यात आले. टोळी हे सोने दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात विकणार होती.
आमिषे दाखवून भरती
तातडीने पैसा कमावण्याचे आमिष दाखवून ही टोळी देशातील विविध भागांतील गरजू आणि गरीब लोकांना तस्करीसाठी भरती करायची. सोन्याची तस्करी करण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेर्ल्वमार्गांचा वापर केला जात असे.