अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

By शेखर पानसरे | Published: April 11, 2023 06:09 PM2023-04-11T18:09:31+5:302023-04-11T18:15:51+5:30

दोघांविरुद्ध मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Smuggling beef by hiding it under trays of eggs; Police case against both | अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

googlenewsNext

संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल करत चारचाकी वाहनात अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी सुरू होती. हे वाहन गस्तीवर असलेल्या संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पकडले. सोमवारी (दि. १०) रात्री ११. ५५ च्या सुमारास शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर घुलेवाडी गावच्या शिवारात कारवाई करत दोघांविरुद्ध मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   

इंजमाम आयाज शेख (वय २४, रा. मदिनानगर, संगमनेर), ऋषिकेश मच्छिंद्र भोसले (वय २०, रा. अलकानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉस्टेबल विवेक दत्तू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७०० किलो गोमांस, ४ हजार ८०० रूपये अंड्यांचे, २ लाख रुपयांचे चारचाकी वाहन (एम. एच. १७, बी. वाय. ६१४०) असा एकूण ३ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल आदींनी ही कारवाई केली. पोलिस नाईक धनंजय महाले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Smuggling beef by hiding it under trays of eggs; Police case against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.