कडीपत्त्याच्या नावाखाली अॅमेझॉनवरून होत होती गांजाची तस्करी, असा झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 03:46 PM2021-11-14T15:46:18+5:302021-11-14T15:46:58+5:30
Online Marijuana Smuggling: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Amazon वरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्कती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी यामधील एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना सुमारे २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
भोपाळ - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या अॅमेझॉनवरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्कती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी यामधील एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना सुमारे २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गांजाची तस्करी ही कडीपत्त्याचे नाव देऊन होत होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गांजाचा हा साठा विशाखापट्टणममधून ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये मागवण्यात आला होता. आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये अॅमेझॉनच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल एक टन मारिजुआनाची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिची त्यांनी दिली.
गांजासोबत पोलिसांनी ज्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामधील एकाची ओळख सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्र सिंह तोमर अशी पटली आहे. हा २० किलो गांजा विशाखापट्टणम येथून अॅमेझॉनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता.
पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या लोकांकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यामध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून निर्बंध घातलेला हा मादक पदार्थ मागवण्यात येत होता. या माध्यमातून सुमारे एक टन गांजा आधीच मागवण्यात आला होता. या माध्यमातून आरोपींनी गेल्या चार महिन्यांमध्ये एक कोटी १० लाख रुपयांच्या गांजाची तस्करी केली आहे.
दरम्यान, दोन आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याला हरिद्वार येथून पकडण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमधून आरोपी सूरज ऊर्फ कल्लू पवय्या हा अॅमेझॉनवरून कडीपत्त्याचा टॅग लावून गांजाची डिलिव्हरी ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर जिल्ह्यांमध्ये होत असे.