संत्र्याच्या आड गांजाची तस्करी, २०० किलो माल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

By योगेश पांडे | Published: October 23, 2023 03:18 PM2023-10-23T15:18:48+5:302023-10-23T15:19:23+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला भंडारा मार्ग येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गांजा जाणार असल्याची टीप मिळाली.

Smuggling of ganja under the guise of oranges, 200 kg cargo seized; Crime Branch action in nagpur | संत्र्याच्या आड गांजाची तस्करी, २०० किलो माल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

संत्र्याच्या आड गांजाची तस्करी, २०० किलो माल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

योगेश पांडे - नागपूर

नागपूर : ‘डीआरआय’च्या कारवाईनंतर आता नागपूर पोलिसांनादेखील गांजा तस्करीबाबत जाग आली असून पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. भंडारा मार्गावर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने कारवाई करत तब्बल २०० किलो गांजा जप्त केला. संत्र्याचा आड या गांज्याची तस्करी सुरू होती व त्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला भंडारा मार्ग येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गांजा जाणार असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा रचला व कापली पुलाजवळ एमएच १३ एएक्स ४८६६ या ट्रकला थांबवले. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता संत्र्याच्या कॅरेटच्या खाली ९ प्लास्टिकचे पोते आढळले. त्यात १९९ किलो ८७४ ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत ३९ लाख ९७ हजार इतकी आहे. पोलिसांनी शेख अल्ताफ शेख सलीम (३६, मोठा ताजबाग), प्रमोद दिलीप कळने (३०, टिपू सुलतान चौक, यषोधरानगर) आणि अक्षय विनोद शेंडे (२४,यादव नगर, यषोधरानगर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ट्रकसह एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपींविरोधात पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल शिरे, विक्रांत थारकर, पंकज भोपळे, रोठे, कोहळे, राजेश लोही, प्रमोद वाघ, टप्पुलाल चुटे, निखील जामगडे, राजेंद्र टाकळीकर, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी, अमोल भक्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Smuggling of ganja under the guise of oranges, 200 kg cargo seized; Crime Branch action in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.