... म्हणून आर्यन खान NCB च्या SIT समोर आज पोहोचू शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 07:53 PM2021-11-07T19:53:34+5:302021-11-07T19:53:41+5:30
Aryan Khan : एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने समन्स बजावले होते. एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आर्यन ताप असल्याने तो चौकशीला हजर राहू शकणार नाही, असं एनसीबी अधिकाऱ्यांना कळविले आहे.
Aryan Khan was summoned by the Special Investigation Team (SIT) of the Narcotics Control Bureau (NCB) for questioning in connection with drugs-on-cruise-case today. However, due to a slight fever, he will not be coming, NCB Official said
— ANI (@ANI) November 7, 2021
एनसीबीचे विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करत असलेल्या ६ प्रकरणांमधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आर्यन खानलाही आज समन बजावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला रविवारी सहा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.(Aryan Khan Summon By NCB SIT)
एनसीबीच्या एसआयटीने नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. एसआयटी ज्या सहा प्रकरणांचा तपास करत आहे, त्या सर्व लोकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. एनसीबीची ही टीम क्रूझवरही गेली होती आणि तेथे क्राईम सीन रीक्रिएट करण्यात आला होता. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असलेला आणखी एक आरोपी अरबाज मर्चंटलाही एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते.