... म्हणून 'त्या' नवरदेवावर झाला गुन्हा दाखल ; ग्रामपंचायतने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:45 PM2020-06-17T17:45:19+5:302020-06-17T17:48:01+5:30

आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंग करून लग्न सोहळ्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असल्यामुळे नवरदेव मच्छिंद्र कोरडे सह अन्य 4 व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

... so filing a case against 'that' groom; Action taken by Gram Panchayat | ... म्हणून 'त्या' नवरदेवावर झाला गुन्हा दाखल ; ग्रामपंचायतने केली कारवाई

... म्हणून 'त्या' नवरदेवावर झाला गुन्हा दाखल ; ग्रामपंचायतने केली कारवाई

Next
ठळक मुद्देखाजगी दवाखान्यातील व्यवस्थापक कोरडे याचा लग्न सोहळा 11 जून रोजी केळघर येथे आयोजित केला होता.लॉकडाऊन काळात पहिलेच मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्गाला पुन्हा सलग पाच दिवस दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

हुसेन मेमन

जव्हारमध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून तो खाजगी दवाखान्याच्या नर्स यांच्या संपर्कातील तथा व्यवस्थापकाच्या लग्न सोहळ्यामुळेच वाढला असून, केळघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने फिर्याद नोंदविली आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंग करून लग्न सोहळ्यात 50 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असल्यामुळे नवरदेव मच्छिंद्र कोरडे सह अन्य 4 व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी दवाखान्यातील व्यवस्थापक कोरडे याचा लग्न सोहळा 11 जून रोजी केळघर येथे आयोजित केला होता, सध्या कोरोनामुळे लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग होऊ नये असा निर्बंध शासनाकडून लावण्यात आलेला आहे, तरीही स्वाबचे नमुने गेलेले असताना, अहवाल अप्राप्त असताना त्यांनी लग्न सोहळा पार पाडला यात 250 ते 300 लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे मनाई आदेशाचे भंग करून, विनापरवांगी लग्न समारंभाचे आयोजन केले, विनापरवांगी 50 पेक्षा जास्त लोक हजर ठेवले, तसेच हजर असलेल्या लोकांपैकी बऱ्याच लोकांनी त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल लावला बांधला नव्हता, त्यामुळे मोठ्याप्रमाणात कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाला म्हणून भा.दं.वि. कलम 188 अन्वये भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 अ व 135 प्रमाणे  नवरदेव व त्यांच्या कुटुंबातील इतर चार अशा 5 व्यक्तींवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दरम्यान तो एका जव्हारच्या एस.टी. महामंडळाच्या चालकाच्या संपर्कात आला होता, त्यामुळे त्याचे व इतर 5 व्यक्तींचे स्वाबचे नमुने 10 जून रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, मात्र स्वाबचे नमुने पाठविले असताना त्यांना शासकीय विलगिकरन कक्षात असणे बंधनकारक होते, मात्र हा कोणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरत होता, त्यांचे लग्न सोहळाही पार पडला आणि न होणारी अघटीत घटना घडली असून, जव्हार तालुक्यात 39 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली. आरोग्याशी निगडित असेलेल्या व्यक्तीकडून अशाप्रकारे हलगर्जीपणा होत असल्याने व संबंधित खाजगी दवाखान्यातील उच्चशिक्षित डॉक्टरांकडून स्वाबचे नमुने तपासणीसाठी गेले असताना दवाखाना सुरू ठेऊन रुग्ण तपासणे हे कितपत योग्य आहे, त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात पहिलेच मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्गाला पुन्हा सलग पाच दिवस दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

Web Title: ... so filing a case against 'that' groom; Action taken by Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.