...म्हणून इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांच्या लिलावाकडे कोणी फिरकलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 07:38 PM2019-11-19T19:38:20+5:302019-11-19T19:58:37+5:30
आजचा लिलाव अयशस्वी ठरला आहे.
मुंबई - मृत गॅंगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेच्या लिलावास आज सकाळी सुरुवात झाली. सांताक्रूझ पश्चिमेकडील दोन फ्लॅट आणि इतर ठिकाणी ४ मालमत्ता
मुंबई इक्बाल मिर्ची (इक्बाल मिर्ची) आणि त्याच्या कुटुंबातील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबातील मालमत्तांचा लिलाव अयशस्वी ठरला आहे. त्यांचा तस्करी व परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत (सफेमा) लिलाव होणार होता. मंगळवारी इक्बाल मिर्चीच्या सांताक्रूझ पश्चिम येथे मिल्टन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 501 आणि 502 साठी बोली लावण्यात येणार होती. परंतु फ्लॅटची रक्कम जास्त असल्यामुळे कोणी लिलावात भाग घेतला नाही. जास्त किंमतीमुळे कोणीही ही संपत्ती विकत घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा लिलाव अयशस्वी ठरला आहे.
इक्बाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्तेचा आज ईडीकडून (स्मगलर्स अँड फॉरेन मॅनिप्युलेटर्स ऑथीरिटीमार्फत)सफेमानुसार या मालमत्तेचा लिलावा होणार होता. लिलावा करण्यात येणाऱ्या मालमत्तेची किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये इतकी असून १२४५ चौरस फुटांचे हे दोन फ्लॅट आहेत. सांताक्रूझ येथील जुहूतारा रोड येथे इक्बाल मिर्चीचे हे दोन अलिशान फ्लॅट आहेत. सध्या या दोन्ही फ्लॅटची किंमत तीन कोटी ४५ लाख इतकी आहे. या दोन्ही फ्लॅटचा लिलावा आज सफेमाच्या नरीमन पाँईट येथील कार्यालयात होणार होता. मात्र, लिलावात कोणी सामील न झाल्याने लिलाव पूर्ण झाला नाही.
काही महिन्यांपूर्वी याच सफेमाच्या कार्यालयात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा लिलावा करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला समन्स बजावले आहे. राज कुंद्राची ३० ऑक्टोबरला मुंबईतील ईडी कार्यालयात आठ तास चौकशी करण्यात आली. त्याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची देखील ईडीने चौकशी केली.
किती आहे मिर्चीची संपत्ती ?
१९९४ साली पोलिसांनी इक्बाल मिर्चीला तडीपार म्हणून घोषित केले. त्यावेळी तो दाऊदचा अमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय संभाळायचा. कालांतराने मिर्चीने भारतातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलकडून नोटीस काढण्यात आली. सौदी अरेबियात जाऊन लपलेला मिर्ची कालांतराने कुटुंबासोबत लंडन येथे स्थायिक झाला. त्या ठिकाणी तो लिगल इस्टेटचा व्यवसाय करू लागला. मात्र, १४ ऑगस्ट २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नावे पाच मालमत्ता असल्याचे कुटुंबियांच्या चौकशीतून उघड झाली आहे. यातील दोन मालमत्ता मे.सनब्लिक व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि.यांना विकण्यात आल्या. वरळीत २०११ मध्ये सनब्लिक रिअल्टर्सला विकण्यात आल्या.
गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेच्या लिलावाला सुरूवात; सांताक्रूझला दोन सदनिका आणि इतर ठिकाणी 4 मालमत्ता https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 19, 2019
R N D'souza, Additional Commissioner, Smugglers & Foreign Exchange Manipulators (forfeited of property) Act, 1976 (SAFEMA): We were given the impression that prices were a little higher than market price, this issue will be considered.We will put the properties for auction again. https://t.co/ehfhOchaOPpic.twitter.com/8Wl7AR3tVT
— ANI (@ANI) November 19, 2019