...म्हणून गरोदर पत्नीला पतीने दिले धावत्या लोकलमधून ढकलून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:49 PM2019-11-27T17:49:12+5:302019-11-27T17:52:08+5:30
वसई - दुसऱ्या पत्नीपासून मुल नको असल्याने सतत भांडणाचे खटके दोघांत उडत असत. नंतर प्रवासात झालेल्यानंतर पतीने सहा महिन्याच्या गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून ...
वसई - दुसऱ्या पत्नीपासून मुल नको असल्याने सतत भांडणाचे खटके दोघांत उडत असत. नंतर प्रवासात झालेल्यानंतर पतीने सहा महिन्याच्या गरोदर पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. मात्र, सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने पत्नीचा जीव वाचला. हा धक्कादायक प्रकार दहीसर - मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान घडला असून याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे नाव सागर धोडी (25) असं असल्याची माहिती सहाय्य्क पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सागर आणि त्याची पत्नी राणी लोकलने नालासोपाऱ्याला जात असताना त्यांच्यात भांडण सुरु झाले. सागरने राणी (20) नावाच्या महिलेची दुसरे लग्न केले होते. रागाच्या भरात संताप अनावर झाल्याने सागरने राणीला ट्रेनमधून बाहेर ढकलले. दैव बलवत्तर म्हणून राणीचा जीव वाचला. सागरला मूल नको होते त्यावरुन तो सतत राणीबरोबर भांडण करायचा असे राणीने पोलीस तक्रारीत सांगितले असल्याची महिती पाटील यांनी दिली. या घटनेनंतर सागर मोबाईल बंद करून फरार झाला आहे. सागर विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. सागरचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजताच पहिली पत्नी मुलांना घेऊन घरातून निघून माहेरी बोरिवली येथील रावळपाडा येथे गेली. त्यानंतर 1 नोव्हेंबरला सागरने राणी बरोबर दुसरे लग्न केले. राणीने लग्न केले त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. सागरला राणीपासून मुल नको हवं होतं. त्यामुळे तो सतत राणीशी भांडण करत असे. याला कंटाळून राणी तिच्या नातेवाईकांकडे निघून गेली अशी माहिती पाटील यांनी दिली. नंतर 15 नोव्हेंबरला सागर तिला भेटायला गेला आणि त्यांनी बोरीवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात जोरदार भांडण झाले. लोकलने दहीसर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला आणि तिला बाहेर ढकलून दिले.यात राणीच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळयांना मार लागला आहे. जीआरपीने माहिती मिळताच राणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले. वसई लोहमार्ग पोलीस सागर धोडीचा शोध घेत आहेत.