Video : संतापजनक...मद्यपान करून चौघींनी गोंधळ घालत पोलिसांवर केला हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 03:30 PM2018-10-03T15:30:45+5:302018-10-03T15:45:47+5:30

मैदानात त्या एकमेकींमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्यानंतर गर्दी जमा झाली. गोंधळ वाढल्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असणारे तीन पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटीलही होत्या.

So sad... drinken girls attack on cops | Video : संतापजनक...मद्यपान करून चौघींनी गोंधळ घालत पोलिसांवर केला हल्ला  

Video : संतापजनक...मद्यपान करून चौघींनी गोंधळ घालत पोलिसांवर केला हल्ला  

Next

मुंबई - मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या ४ तरुणींनी पोलिसांवरच हात उगारल्याची संतापजनक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत तरुणींनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाईंदर येथील मैदानात गोंधळ घातला. पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसाच्या हातातील लाठीकाठी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघींना अटक करण्यात आली असून एक तरुणी फरार आहे. ममता मेहर (वय २५), आलिशा पिल्लाई (वय २३), कमल श्रीवास्तव (वय २२) आणि जस्सी डिकोस्टा (वय २२) अशी या आरोपी तरुणींची नावे आहेत. या चौघींनी मीरारो़ड येथे रात्री पार्टी केली आणि रात्री दोनच्या सुमारास त्या भाईंदरमधील शहीद भगतसिंग मैदानात पोहोचल्या. मैदानात त्या एकमेकींमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्यानंतर गर्दी जमा झाली. गोंधळ वाढल्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असणारे तीन पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटीलही होत्या.

पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ करत पोलिसांच्या हातातील लाठीकाठी काढून घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिघींना पोलिसांना अटक केली असून डिकोस्टा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. या चौघींपैकी फक्त डिकोस्टा एकटी नालासोपारा येथे राहते. अन्य तीन तरुणी मीरा रोड येथे रहायला आहेत. पोलिसांनी या चौघींविरोधात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: So sad... drinken girls attack on cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.