... म्हणून मदुराईतील मीनाक्षी अम्मन मंदिराची सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:53 PM2019-11-28T13:53:21+5:302019-11-28T13:54:27+5:30
बॉम्ब डिस्पोझल पथक मंदिराबाहेर आणि आत तैनात करण्यात आले आहे.
तामिळनाडू - काल रात्री सुरक्षा यंत्रणांना ईमेलद्वारे मदुराईतील जगप्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर आज मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर येथे पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे.
तामिळनाडू - बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर येथे पोलिसांची सुरक्षा वाढवली https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) November 28, 2019
आज बॉम्ब स्कॉड या मंदिर परिसराची पाहणी करत असून कडेकोट बंदोबस्त मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच त्यांना आता दर्शनासाठी जाण्यास परवानगी मिळत आहे. बॉम्ब डिस्पोझल पथक मंदिराबाहेर आणि आत तैनात करण्यात आले आहे. ईमेलद्वारे काल रात्री पोलिसांना मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे.
Tamil Nadu: Security forces have been deployed at Meenakshi Amman Temple, in Madurai after the authority received a bomb threat regarding the temple, last night. Bomb experts are investigating the area.
— ANI (@ANI) November 28, 2019