...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 08:17 PM2021-01-05T20:17:09+5:302021-01-05T20:17:35+5:30

Crime News : आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. 

... so 'she' used Ratan Tata's car number, broke the traffic rules; The lesson taught by the police | ...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी इसमाकडे अधिक तपास केला असता त्याने अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मूळ नंबरप्लेटमध्ये बदल करून बनावट नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे सांगितले.

मुंबई - वरळी येथील वाहतूक पोलीस मुख्यालयास एक वाहन चालक हा बनावट वाहन क्रमांकाचा वापर करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वाहतूक नियंत्रण शाखेकडून या तक्रारीचे निरसन करत  असताना प्रसिध्द उद्योजक रतन टाटा यांच्या मालकीच्या वाहन क्रमांकाचा वापर करुन वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाहनाने यापुर्वी केलेल्या गुन्हाचा आढावा घेतला. मुंबई शहरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा वापर करुन आणि अथक परिश्रम घेऊन वाहतूक पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला. शोधाअंती ते वाहन हे मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा. लि. यांचे मालकीचे असल्यावे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी इसमाकडे अधिक तपास केला असता त्याने अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मूळ नंबरप्लेटमध्ये बदल करून बनावट नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा.लि.च्या संचालिका यांच्याविरुध्द बनावट नंबरप्लेटवा वापर करुन कायद्याचा भंग केल्याने माटुंगा पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम ४२०,४६५ आणि मोटर वाहन कायदा कलम  ३९,१९२ आणि केंद्रिय मोटर वाहन नियम  ५०/१७७  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून अधिक तपास माटुंगा पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या मोटार वाहनावरील चुकीचे झालेले ईचलन हे आरोपी इसमाच्या वाहनावर वर्ग करण्यात आलेले आहेत. 

Web Title: ... so 'she' used Ratan Tata's car number, broke the traffic rules; The lesson taught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.