...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:22 PM2021-10-05T23:22:11+5:302021-10-05T23:23:06+5:30

Cruise Drugs Party : या पार्टीविषयी गोव्यात कोणतेही लिंक आढळून आल्यास त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.

... so we will cooperate! Goa Chief Minister welcomes NCB's Cruise Drugs Party action | ...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

Next

पणजी: मुंबई-गोवा जलमार्ग वरील क्रूजमध्ये झालेल्या पार्टी वरील कारवाईचे गोव्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या कारवाईबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ड्रग्ज व्यवहाराबाबत बाबतीत कोणतीही तडजोड गोवा सरकार करणार नाही. एनसीबीच्या या कारवाईबद्दल अद्याप राज्याला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या पार्टीविषयी गोव्यात कोणतेही लिंक आढळून आल्यास त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर याविषयी बोलताना म्हणाले की, गोव्याला ड्रग्सचा व्यवहार करणारे पर्यटक नको आहेत. राज्याकडून ते खपवून घेतले जाणार नाही. संबंधित यंत्रणेने त्यावर लक्ष ठेवून आहेत. एनसीबीच्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले.

Web Title: ... so we will cooperate! Goa Chief Minister welcomes NCB's Cruise Drugs Party action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.