...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:53 PM2020-07-29T22:53:04+5:302020-07-29T22:55:09+5:30

याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकले आहे. त्यामुळे रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

... So when the Bihar police squad reached Mumbai, Riya ran to the Supreme Court | ...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

Next
ठळक मुद्देमानेशिंदे यांनी अंतरिम जामीनासाठी मंगळवारीच कागदोपत्री प्रक्रिया केली होती.

मुंबई - सुशात सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सध्या अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. महत्त्वाचं म्हणजे सुशांतचे वडील कुंदन कुमार यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून बिहार येथील कोर्टात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकले आहे. त्यामुळे रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

 

बिहार पोलिसांचं पथक चौकशीसाठी मुंबईत आल्याने रिया चक्रवर्तीने तपास मुंबईतच वर्ग करण्यासाठी सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका केली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

 

मानेशिंदे यांनी अंतरिम जामीनासाठी मंगळवारीच कागदोपत्री प्रक्रिया केली होती. सुशांतच्या वडिलांनी सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती दिली होती. रिया मुद्दाम सुशांतला मानसिकरित्या आजारी असल्याचं दाखवत होते असंही सुशांतचे वडील केके सिंह यांनी सांगितले.

सतीश मानेशिंदे हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि सेेेलिब्रेटींचे वकील म्हणून ओळखले जातात. सतीश मानेशिंदे हे रियाची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तचा खटला लढविला होता. 

 

१९९८ मधील काळवीट शिकार प्रकरण असो की संजय दत्तची १९९३ मधील मुंबंई साखळी हल्ला असो दोघांचीही वकिली मानेशिंदे यांनी केली होती. आज रिया अंतरिम जामीनासाठी अर्ज करू शकते.

 

Web Title: ... So when the Bihar police squad reached Mumbai, Riya ran to the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.