...म्हणून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महिलांचा अधिक वापर

By पूनम अपराज | Published: September 20, 2018 08:57 PM2018-09-20T20:57:51+5:302018-09-20T20:59:04+5:30

महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

... so women use more for smuggling of drugs | ...म्हणून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महिलांचा अधिक वापर

...म्हणून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महिलांचा अधिक वापर

googlenewsNext

 

मुंबई - अमली पदार्थाविरोधी मोहिमेचा पोलिसांनी चांगलाच फास आवळला आहे. अनेक गुन्हे हे अमली पदार्थाच्या सेवनाआहारी गेल्याने उघड झाल्यानंतर भांडुपमध्ये नागरिकांनी मोठा मोर्चा काढून याला वाचा फोडली होती. अमली पदार्थ पुरविणाऱ्या साखळीवर आघात केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना रडावर घेतले आहे. त्यातही महिला विक्रेत्यांवर पथकाची विशेष नजर आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात विविध ठिकाणी कारवाया करून पथकाने ११ छोटया-मोठया महिला विक्रेत्यांना बेडया ठोकल्याने या तस्करीत महिला तस्करांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच २०१५ साली मोठ्या प्रमाणावर एमडी हा घटक अमली पदार्थ पुरविणारी वरळीत राहणारी बेबी पाटणकर हे महिला तस्करीतील मोठे नाव आहे.  
गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने एमडीचे उत्पादक, वितरक, बडे पुरवठादारांना शिताफीने अटक केली. त्यापाठोपाठ चरस, गांजा आणि कोकेनच्या वितरण साखळीविरोधात धडक मोहीम उघडली. या साखळीविरोधात सुमारे ६५ गुन्हे नोंद करण्यात आले. आरोपींना अटक केली गेली आणि त्यांच्याकडून मोठया प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला गेला. या कारवाईमुळे सध्या अमली पदार्थाचा मोठा साठा पोहचविणारे तस्कर हे माघार भूमिका घेत नकार देतात. या वर्षी विशेषतः जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून पथकाच्या विविध कक्षांनी हद्दीतल्या किरकोळ प्रमाणातील अमली पदार्थ थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणार्या विक्रेत्यांची धरपकड सुरू केली आहे.
ऑगस्ट महिन्यात पथकाने भांडुप, वरळी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे या परिसरात छापे टाकून २१ विक्रेत्यांना अटक केली. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. वरळी पथकाने नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणणाऱ्या लता चौरे या महिलेला बेडया ठोकल्या. तिच्याकडून १० किलो गांजा हस्तगत केला गेला. लताने गेल्या दोन - एक महिन्यांमध्ये मुंबईच्या १५ ते २० वाऱ्या  केल्या. आरोग्यसेविकेच्या वेशात तिने गांजाचा किरकोळ साठा दडवून मुंबईत आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तिने हा साठा वरळीतल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणला होता. त्यापैकी राणी बरसैया या महिलेस अटक केली. राणी पूर्वी गावठी दारूचा गुत्ता चालवत असे. मात्र, कालांतराने ती गांजा विक्रीत उतरली.
तसेच गावठी दारूचा गुत्ता चालवि़्ाणाऱ्या  बहुतांश महिला सध्या अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. कारण नाकाबंदी, धरपकडीत महिलांकडे पाहाण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन वेगळा असतो. महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Web Title: ... so women use more for smuggling of drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.