सेक्स वर्कर बनली, ड्रग्सही विकले; दररोज 1 लाख रूपयांच्या नशेच्या सवयीने केलं तिला उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:28 AM2023-04-22T10:28:25+5:302023-04-22T10:31:12+5:30
ड्रग्स सप्लाय केसमध्ये पकडली गेल्यावर सुनावणी दरम्यान मॉस हे सांगताना रडली आणि म्हणाली की, तिला एका दिवशी 1.23 लाख रूपयाचं कोकिन लागत होतं.
नशेची सवय माणसाला उद्ध्वस्त करते. एका महिलेसोबत तेच झालं. ती एक लक्झरी लाइफ जगत होती, पण ड्रग्सच्या सवयीने तिला उद्ध्वस्त केलं. आता ती तुरूंगात आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील ही घटना आहे. 27 वर्षीय या महिलेचं नाव एलॅग्जेंड्रा मॉस आहे.
ड्रग्स सप्लाय केसमध्ये पकडली गेल्यावर सुनावणी दरम्यान मॉस हे सांगताना रडली आणि म्हणाली की, तिला एका दिवशी 1.23 लाख रूपयाचं कोकेन लागत होतं. इतकी महागडी गरज पूर्ण करण्यासाठी तिने ड्रग्स विकण्यापासून ते सेक्स वर्करपर्यंतचं काम केलं.
मॉस सिडनीच्या रोज बे मध्ये तिच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स डीलिंग करत होती. पोलिसांनी तिचा फोन टॅप केल्यानंतर तिला अटक केली होती. तिच्या घरात कोकिन आणि गांजा आढळून आला. अटक केल्यावर मॉसने मान्य केलं की, तिने तिची गरज भागवण्यासाठी डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान ड्रग्सचा व्यवसाय केला.
चौकशीतून समोर आलं की, नशेचा खर्च भागवण्यासाठी ती सेक्स वर्कर म्हणूनही काम करत होती. जेव्हा तिला अटक केली गेली तेव्हा तिच्याकडे 9.6 किलो ड्रग्स सापडले.
पोलिसांना मॉसच्या फोनमध्ये अनेक फोटोही सापडले ज्यात ती ड्रग्सची पॅकेट हातात घेऊन हसताना दिसत आहे. ती कोर्टात म्हणाली की, 'ती तिच्या अटकेसाठी स्वत:ला जबाबदार मानते'. पोलिसांनी तिच्या घरात मोठी रक्कमही सापडली. याबाबत ती म्हणाली की, तिने हे ड्रग्स डीलिंग करून नाही तर सेक्स वर्क करून कमावले आहेत. मेडिकल टेस्टमधून समोर आलं की, ती डिप्रेशनने ग्रस्त आहे. तसेच ती ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी औषधेही घेत होती.
कोर्टाने मॉसला 23 महिन्याच्या नॉन पेरोलसोबत चार वर्ष चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान मॉस सतत रडत होती.