सॉफ्टवेअर इंजिनियरला हाव महागात पडली; क्रेटा एसयुव्ही गिफ्टच्या नावाखाली ७ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 09:55 PM2019-12-01T21:55:16+5:302019-12-01T21:55:33+5:30

१२ लाखांच्या गिफ्टचे आमिषाने भुललविले

Software Engineer cheated by criminals for gifting of SUV Creta in pune | सॉफ्टवेअर इंजिनियरला हाव महागात पडली; क्रेटा एसयुव्ही गिफ्टच्या नावाखाली ७ लाखांना गंडा

सॉफ्टवेअर इंजिनियरला हाव महागात पडली; क्रेटा एसयुव्ही गिफ्टच्या नावाखाली ७ लाखांना गंडा

Next

पुणे : कोणीही कोणाला काहीही फुकट देत नसते, हे माहिती असतानाही कोणी गिफ्ट देत असल्याचे सांगितल्यावर भल्या भल्यांकडून सारासार बुद्धी बाजूला ठेवली जाते आणि सायबर चोरट्यांनी लावलेल्या जाळ्यात ते अलगद सापडत जातात.

 गिफ्टच्या आशेने ते सांगतील, तितके आणि सांगतील, त्या बँक खात्यात पैसे भरत राहतात़ नंतर मग आपण फसविले गेल्याचे त्यांच्या लक्षात येते़ यामध्ये सुशिक्षित लोकच अधिक फसले जात असल्याचे दिसून येत आहे़ सायबर चोरट्यांनी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला आपल्या जाळ्यात अडकून त्याच्याकडून चक्क ७ लाख १७ हजार ५३० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणाºया एका ३८ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ हा प्रकार २७ व २८ आॅगस्ट २०१९ रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून घडला आहे.


हे सॉफ्टवेअर इंजिनियर मुळचे कर्नाटकातील धारवाड येथील राहणारे असून मगरपट्टा येथील एका कंपनीत कामाला आहे़ त्यांच्या मोबाईलवर २७ आॅगस्टला पेटीएम कंपनीकडून एक मेसेज आला़ त्यातील हेल्पलाईन नंबरवर त्यांनी फोन केला़ आदित्य मल्होत्रा नाव सांगणाºयाने त्यांना पेटीएम मॉल कंपनीकडून तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगितले़ गिफ्टमध्ये दोन चॉईस देण्यात आले होते़ त्यात तुम्ही १२ लाख ६० हजार रुपये कॅश जिंकु शकता़ किंवा क्रेटा ही कार घेऊ शकता़ या सॉफ्टवेअर इंजिनियरने कॅश घेणे पसंत केले़ कॅश हवी असेल तर तुम्हाला काही प्रोसिजर पूर्ण करावी लागतील़ ही रक्कम ट्राँन्सफर करण्यासाठी सरकारी सर्टिफिकेट करीता त्यांच्याकडे प्रथम ६ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली़ त्यांनी पैसे भरल्यावर थोड्या वेळाने त्यांना पुन्हा फोन आला़ एवढी रक्कम ट्रॉन्सफर होऊ शकत नाही़ बँकेने ती रक्कम होल्ड केली आहे़ त्यासाठी तुम्हाला आणखीन मार्जीन चॉर्जेस म्हणून २५ हजार २०० रुपये भरावे लागतील़ ते पैसे भरल्यावर त्यांना केंद्र सरकारचे ४८ हजार ८०० रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले़ त्यानंतर बँकेचा वेळ संपल्याने लेट फी म्हणून १८ हजार ८०० रुपये भरण्यास सांगितले़.


त्यानंतर फायनान्सीअर रिपोर्टींग चार्जेस करीता ४९ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले़ गिफ्ट मिळण्याच्या आशेने हे सॉफ्टवेअर इंजिनियर इतके उत्तेजित झाले होते की, कोणताही विचार न करता सायबर चोरटे सांगतील, त्या बँक खात्यात पैसे भरत गेले़ अशा प्रकारे त्यांनी २७ व २८ आॅगस्ट या दोन दिवसात तब्बल ७ लाख १७ हजार ५३० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरले़ त्यांनतर त्यांच्याकडून फोन येणे बंद झाले़ त्यांनी संपर्क केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली़


गिफ्टच्या बहाण्याने सायबर चोरटे मोठ्या प्रमाणावर फसवणुक करीत असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात़ या चोरट्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असे पोलिसांकडून वारंवार आवाहनही केले जाते़ असे असतानाही सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या या तरुणाला इतरांच्या मानाने चांगला पगार असतानाही फुकट मिळत असेल तर या लालचेने त्याच्याकडून शिल्लक सायबर चोरट्यांनी हातोहात लांबविली.

Web Title: Software Engineer cheated by criminals for gifting of SUV Creta in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.