आईचा खून करणाऱ्या फरार मुलाला ३२ महिन्यांनी अटक, कोलकात्यातून पोलिसांनी केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:13 AM2021-09-22T11:13:14+5:302021-09-22T11:13:52+5:30

२९ जानेवारी २०१९ ला आरोपी मुलगा उन्मेश (२२) याने चाकू व सुऱ्याच्या मदतीने आई-वडिलांवर ३५ ते ४० सपासप वार केल्याच्या घटनेने नालासोपारा शहरात खळबळ उडाली होती.

Son absconding after mother's murder arrested after 32 months | आईचा खून करणाऱ्या फरार मुलाला ३२ महिन्यांनी अटक, कोलकात्यातून पोलिसांनी केले जेरबंद 

आईचा खून करणाऱ्या फरार मुलाला ३२ महिन्यांनी अटक, कोलकात्यातून पोलिसांनी केले जेरबंद 

Next

नालासोपारा : शहरात २९ जानेवारी २०१९ ला पहाटे पावणेचारच्या दरम्यान मुलाने चाकू, सुरा, हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला करून आईची हत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपी मुलाला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने ३२ महिन्यांनी कोलकाता शहरातून सोमवारी संध्याकाळी अटक केली.

२९ जानेवारी २०१९ ला आरोपी मुलगा उन्मेश (२२) याने चाकू व सुऱ्याच्या मदतीने आई-वडिलांवर ३५ ते ४० सपासप वार केल्याच्या घटनेने नालासोपारा शहरात खळबळ उडाली होती. आरोपी मुलगा घटना झाल्यानंतर दुचाकीने बडोदा येथे पळून गेला होता. नंतर तिथून दिल्लीत एका हॉटेलमध्ये वर्षभर काम करत होता. तेथून तो कामाच्या शोधात नेपाळला गेला होता, पण काम न मिळाल्याने तो दिल्लीत परत आला होता. काही महिन्यांपूर्वी तो कोलकाता शहरातील एका मॉलमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. कोणताही धागा नसताना आरोपी कोलकाता येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस नाईक सचिन कांबळे, आदिनाथ कदम या तिघांची टीम कोलकाता येथे गेली होती. चार दिवसांपासून सापळा रचून आरोपी मुलाला मॉलमध्ये पकडून तेथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आणले.

दरम्यान, नालासोपाऱ्याच्या पाटणकर पार्क रोडवरील इम्पिरियल टॉवरमध्ये वडील नरेंद्र पवार आणि आई नर्मदावर मुलगा उन्मेश नरेंद्र पवार (२०) याने शेअर मार्केटमध्ये पैशांच्या केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाल्यावरून झालेल्या वादामधून २९ जानेवारी २०१९ ला पहाटे पावणेचारच्या सुमारास झोपलेले वडील नरेंद्र रामचंद्र पवार (५३) आणि आई नर्मदा (५०) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. आई नर्मदा ही गंभीर जखमी झाली होती. १८ दिवस मृत्यूशी झुंज देत असताना तिचा मृत्यू झाला होता.

आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी मुलाला ३२ महिन्यांनी कोलकाता येथून अटक करून आणले आहे. मंगळवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त
 

Web Title: Son absconding after mother's murder arrested after 32 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.