वडिलांच्या खात्यातून मुलानेच चोरले ३२ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 05:46 AM2021-04-09T05:46:32+5:302021-04-09T05:46:44+5:30
पूत सपूत तो क्यों धन संचय म्हणीचा प्रत्यय देणारी घटना
- बलवंत तक्षक
चंदीगड : मुलासाठी आई-वडील काय करत नाहीत. पण, हाच मुलगा जेव्हा पैशांसाठी विश्वासघात करतो तेव्हा पालकांना होणाऱ्या वेदना शब्दातीत असतात. चंदीगडमध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांचे डुप्लिकेट सीम मिळवत त्यांच्या खात्यातून ३२ लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे वडिलांची अक्षरश: झोप उडाली आहे.
पूत सपूत तो क्यों धन संचय, अशी एक म्हण आहे. म्हणजे, मुलगा जर गैरमार्गाने जात असेल तर त्याच्यासाठी पैसा कशासाठी साठवायचा. हा पैसा तो गैरमार्गासाठीच खर्च करणार. सेक्टर ३३ मध्ये राहणाऱ्या नवनीत सिंह यांच्यासाठी हे सर्व अकल्पित आहे. त्यांना बँकेच्या स्टेटमेंटवरून समजले की, त्यांच्या खात्यातून ३२ लाख रुपये काढण्यात आले आहेत.
तीन दिवसांत ॲानलाइन ट्रान्स्फर
पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला की, कार्तिक कोण आहे तेव्हा जे सत्य समोर आले त्यानंतर नवनीत सिंह यांच्यासाठी हा खुलासा धक्कादायक होता.
कारण, हा कार्तिक म्हणजे त्यांचा मुलगाच होता. कार्तिक याने सांगितले की, त्याने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर डुप्लिकेट सीम घेतले. त्यानंतर तीन दिवसात ही रक्कम ऑनलाइन हरदीप यांच्या खात्यात पाठविली.
पोलीस आता याचा शोध घेत आहेत की, कार्तिकचा हरदीप यांच्याशी काय संबंध आहे. पोलिसांनी कार्तिकला अद्याप अटक केलेली नाही.
आयटी ॲक्टनुसार त्यांनी तक्रार दाखल केली. सायबर सेलने तपासही सुरू केला. चौकशीत समोर आले की, ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत ट्रान्सफर करण्यात आली आहे. हे खाते एनआरआय हरदीप सिंह यांच्या नावावर होते. सायबर टीमने संपर्क केल्यानंतर हरदीप यांनी मान्य केले की, हे त्यांचेच खाते आहे. यावर ३२ लाख रुपये जमा झाले आहेत. ते कार्तिक याने ट्रान्सफर केले आहेत.