मुलाला झाला गंभीर आजार तर उपचारासाठी माजी पोलीस बनला चोर, मग झालं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:17 IST2022-02-24T18:17:21+5:302022-02-24T18:17:44+5:30
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव नजीर अहमद इमरान असून त्यांचं वय ६१ वर्षे आहे. पोलिसांनुसार, नजीरने भारतात येण्याआधी ९ वर्षे बहरीनमध्ये पोलिसात नोकरी केली होती.

मुलाला झाला गंभीर आजार तर उपचारासाठी माजी पोलीस बनला चोर, मग झालं असं काही
कर्नाटक (Karnatak) पोलिसांनी बहरीनच्या एका माजी पोलिसाला अटक केली आहे. त्याने कॅन्सरने पीडित मुलाच्या उपचारासाठी गुन्हा केला होता. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव नजीर अहमद इमरान असून त्यांचं वय ६१ वर्षे आहे. पोलिसांनुसार, नजीरने भारतात येण्याआधी ९ वर्षे बहरीनमध्ये पोलिसात नोकरी केली होती.
६१ वर्षीय नजीर अहमद इमरानला १४ वर्षाय दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. आपल्या मुलाला कॅन्सर असल्याचं समजल्यापासून नजीर एक प्रोफेशनल कार चोर बनला होता आणि कार चोरी करून तो मुलाच्या उपाचारासाठी पैशांची व्यवस्था करत होता. अशोकनगर पोलिसांनी नजीरला २००८ मध्ये अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर सुटला होता.
तुरूंगातून बाहेर आल्यावरही त्याने गुन्हे करणं थांबवलं नाही. तो कारची चोरी करत राहिला. अलिकडेच एका सर्व्हिस सेंटरमधून एक एसयूव्ही कार गायब केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी नजीरकडून हाय ग्राउंड पोलीस स्टेशनजवळून दोन चोरी केलेल्या बाइकही ताब्यात घेतल्या आहेत.
चौकशी दरम्यान त्याने खुलासा केला की, तो त्याच्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी गुन्हे करायला लागला. तो वाहनांची चोरी करून त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून ती विकत होता. पोलिसांनी सांगितलं की, नजीर बंगळुरू शहर आणि केरळच्या वेगवेगळ्या भागात वाहनांची चोरी करत होता. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.