भेंडाळा येथे कौटुंबिक कलहातून मुलानं केली वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:46 IST2021-05-20T10:45:07+5:302021-05-20T10:46:35+5:30
नत्थू केशव आसुटकर (४८) असे मृताचे नाव आहे. मुकुटबन पोलिसांनी याप्रकरणी वैभव नत्थू आसुटकर (१९) याला गुरूवारी सकाळी अटक केली.

भेंडाळा येथे कौटुंबिक कलहातून मुलानं केली वडिलांची हत्या
वणी (यवतमाळ) : कौटुंबिक कलहातून मुलाने तिक्ष्ण हत्याराने जन्मदात्या वडिलांची हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा या गावी घडली.
नत्थू केशव आसुटकर (४८) असे मृताचे नाव आहे. मुकुटबन पोलिसांनी याप्रकरणी वैभव नत्थू आसुटकर (१९) याला गुरूवारी सकाळी अटक केली.