मेहकरात मुलाने केली वडीलांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 14:41 IST2021-05-30T14:40:58+5:302021-05-30T14:41:44+5:30
Crime News : मेहकरात मुलाने वडिलांची हत्या केली.

मेहकरात मुलाने केली वडीलांची हत्या
मेहकर: येथील समता नगरात मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी मानसिक आजारी असलेल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे़
पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समता नगरात रहात असलेले गजानन संपत गवई (५५5) हे अमडापूर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक होते. घरात नवरा, बायको व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतात. शुभम हा संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात आहे. शनिवारच्या रात्री गजानन गवई हे आराम करीत असताना शुभमने रागाच्या भरात कुऱ्हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जातो म्हणून घरातून बाहेर पडला. शेजारच्या मंडळींनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शुभमशी संपर्क केला असता तो पोलीस स्टेशन जवळ घुटमळत होता. त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुभम हा मानसिक रूग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. आई वडिलांनी अभ्यास कर, मोबाईल कमी बघ म्हटले की चिडचिड करायचा त्यातूनच खून झाला असावा,असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे़
गजानन गवई यांना एक मुलगा, पत्नी, व चार मुली असून त्या विवाहित आहेत.पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.