मालमत्तेसाठी घोटला वयोवृद्ध वडिलांचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:39 AM2019-03-22T04:39:47+5:302019-03-22T04:40:00+5:30

मालमत्तेसाठी मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर (३५) याला अटक केली आहे.

Son Murder his Father for property | मालमत्तेसाठी घोटला वयोवृद्ध वडिलांचा गळा

मालमत्तेसाठी घोटला वयोवृद्ध वडिलांचा गळा

Next

मुंबई - मालमत्तेसाठी मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर (३५) याला अटक केली आहे.
वाशीनाका परिसरात, ६४ वर्षीय रेहमतुल्ला सय्यद हे तिसऱ्या पत्नीसोबत राहत होते. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. कादर हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. त्याचे सय्यद यांच्यासोबत पैसे तसेच मालमत्तेवरून वाद व्हायचे.
मंगळवारी दुपारी सय्यद घराबाहेर बसला असताना, कादर तेथे धडकला. त्याने, पुन्हा पैशांची मागणी केली. सय्यद यांनी पैशासाठी नकार देताच, कादर याने रागाच्या भरात त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा गळा आवळून हत्या केली. कामानिमित्त सय्यद हे बाहेर असतील म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला नाही.
बुधवारी सकाळी एका कर्मचाऱ्याने त्यांना मृतावस्थेत बघितले. घटनेची वर्दी लागताच, आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. तपासात सय्यद यांची पत्नी मुमताज (३२) यांच्या जबाबावरून वरील घटनाक्रम उघडकीस येताच कादरला अटक करण्यात आली़

Web Title: Son Murder his Father for property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.