भाजप आमदाराचे सुपुत्र लोकायुक्तांच्या जाळ्यात, 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:04 AM2023-03-03T09:04:29+5:302023-03-03T09:05:18+5:30

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडरमध्ये टक्केवारी, पैशांची अफरातफरीचा आरोप केला जात आहे

Son of Karrnatak BJP MLA arrested while accepting bribe of Rs 40 lakh, caught red-handed in karnataka | भाजप आमदाराचे सुपुत्र लोकायुक्तांच्या जाळ्यात, 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक

भाजप आमदाराचे सुपुत्र लोकायुक्तांच्या जाळ्यात, 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक

googlenewsNext

कर्नाटकमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील बंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. मदल विरुपक्षप्पा हे येथील आमदार असून प्रशांत हे त्यांचेच चिरंजीव आहेत. त्यामुळे, आमदाराच्या पोरानेच ४० लाख रुपयांची लाच घेतल्याने भाजपसाठी ही मोठी अडचण ठरू शकते. 

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडरमध्ये टक्केवारी, पैशांची अफरातफरीचा आरोप केला जात आहे. प्रशांत यांनी एका टेंडर प्रक्रियेला क्लिअर करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याचपैकी, ४० लाख रुपयांची रक्कम स्विकार करताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांना रंगेहात अटक केली. लोकायुक्तांकडून आता या घटनेची व कागदपत्रांची सखोल चौकशी होत आहे. 

कर्नाटक साबण आणि डिटेर्जेंटला लिमिटेड (केएसडीएल) बोर्डासाठी कच्चा माल पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवरुन याबाबत तक्रार करण्यात आली होती. प्रशांतचे वडिल आमदार मदल विरुपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित अधिकारी भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराच्या मुलावर करण्यात आलेली ही कारवाई भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. तसेच, भाजप नेत्यांवर या प्रकरणामुळे नामुष्की ओढावली आहे. लोकायुक्तांनी सांगितले की, आरोपीने लाच म्हणून ८१ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र ४० लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. प्रशांत हे लाचलुचपंत प्रतिबंधक विभागाचे सल्लागारही राहिले होते, एसीबी बंद झाल्यानंतर त्यांनी लोकायुक्तमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. 
 

Web Title: Son of Karrnatak BJP MLA arrested while accepting bribe of Rs 40 lakh, caught red-handed in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.