Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याकांडात मोठ्या राजकीय नेत्याचा हात?; कुटुंबाने घेतलं 'या' व्यक्तीचं नाव, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:50 PM2022-08-30T13:50:04+5:302022-08-30T14:01:39+5:30

Sonali Phogat : सोनाली यांच्या हत्येचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असली तरी मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही.

Sonali Phogat death case investigation goa police visit hisar confidential report to cm haryan | Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याकांडात मोठ्या राजकीय नेत्याचा हात?; कुटुंबाने घेतलं 'या' व्यक्तीचं नाव, म्हणाले...

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याकांडात मोठ्या राजकीय नेत्याचा हात?; कुटुंबाने घेतलं 'या' व्यक्तीचं नाव, म्हणाले...

googlenewsNext

सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूप्रकरणी सस्पेन्स वाढत आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असली तरी मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता गोवा पोलिसांचे पथक सोनाली फोगाट यांच्या हरियाणातील हिसार येथील घरी पोहोचले आहेत. सोनाली यांच्या हत्येचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी कुटुंबाने लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी टीम सोनाली आणि सुधीर सांगवान यांच्या घरी जाईल असं म्हटलं आहे. 

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोगाटच्या कुटुंबातील लोकांनी गंभीर आरोप केले आहेत. या हत्येत काही मोठ्या राजकारण्यांचाही हात असू शकतो. त्यामुळे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सरकारने गोवा सरकारला पत्र लिहिले आहे. सूत्रांनी सांगितले की, कुटुंबाने स्पष्टपणे एका राजकीय व्यक्तीचं नाव देखील दिलं आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे जावे अशी सरकारची इच्छा आहे.

सोनाली यांचा भाऊ वतन ढाका यांनी हरियाणाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गोपाळ कांडा यांचे नाव घेतले आहे. सुधीर सांगवानसह सोनाली यांच्या हत्येतील आरोपींना गोपाळ कांडा यांनी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वतन ढाका उर्फ ​​रिंकूने यांनी सांगितले की, भिवानी जिल्ह्यातील सुखविंदर काही वर्षांपूर्वी सिरसा येथे गोपाळ कांडा यांच्यासोबत राहत होता. गोव्यातील गोपाळ कांडा यांच्याशीही संपर्क साधल्याचा आरोप त्यांनी केला.

सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर यांच्यावर सोनाली फोगाट यांची संपत्ती हडपण्यासाठी हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. सोनाली यांची हत्या करून तिची नैसर्गिक हत्या करण्याचा कट जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सुधीरने काही तांत्रिकांच्या मदतीने सोनाली यांना फसवण्यास सुरुवात केली. कुटुंबाकडूनच जीवाला धोका असल्याचे सांगून त्यांना कुटुंबापासून दूर ठेवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: Sonali Phogat death case investigation goa police visit hisar confidential report to cm haryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.