Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 09:45 AM2022-08-28T09:45:19+5:302022-08-28T09:45:42+5:30

Sonali Phogat Drug Name: एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते.

Sonali Phogat Drug Video: Which drug was given to Sonali Phogat? To make her mood or to kill, the name came out Methamphetamine | Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

googlenewsNext

भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूने सारे इंटरनेट हादरविले आहे. रोज तिच्या मृत्यूबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता तर तिला काहीतरी पाजतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये ती देखील नाचताना सांगवान पाजत असलेल्या बॉटलमधील द्रव्य पित आहे. 

पोलिसांनी कर्ली क्लबच्या बाथरुममधून काल दीड ग्रॅम ड्रग जप्त केले होते. ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवानने ते ड्रग पेडलरकडून घेतले आहे. गोवा पोलिसांनी काल रात्री आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. क्लब मालक एडविन न्यून्स यालाही अटक करण्यात आली आहे. पहिला ड्रग पेडलर हा सोनाली ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्या हॉटेलचाच कर्मचारी आहे. सांगवान आणि त्याने ड्रगची देवानघेवाण केल्याचे कबूल केले आहे. 

Methamphetamine काय आहे...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्युज (NIDA) नुसार, मेथॅम्फेटामाइन हे अत्यंत घातक आणि शक्तिशाली औषध आहे. एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. मेथॅम्फेटामाइन हे काचेच्या भुश्या सारखे दिसते. हे औषध रासायनिकदृष्ट्या अॅम्फेटामाइनसारखेच असते. अॅम्फेटामाइनचा उपयोग अटेंशन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) आणि नार्कोलेप्सी, झोपेचा विकार यावर उपचार करण्यासाठी औषध म्हणून केला जातो. सोनालीली मेथॅम्फेटामाइन पाण्यातून देण्यात आले होते. 

मेथॅम्फेटामाइन या औषधामुळे मेंदूतील डोपामाइनचे प्रमाण वाढते. डोपामाइन एक न्यूरोट्रांसमीटर आहे. मेंदूतील चेतापेशींमधील सिग्नल पाठवणारे रसायन. डोपामाइन मेंदूच्या फील गुड घटकासाठी देखील जबाबदार आहे, जो तुमचा मूड चांगला ठेवण्यास मदत करतो. जेव्हा हा व्यक्ती आपल्या आवडत्या गोष्टीच्या संपर्कात असतो, तेव्हाच हे औषध मेंदूमध्ये काम करण्यास सुरुवात करते. यामुळे हा व्यक्ती आनंद घेण्यास सुरुवात करतो. मग तो शरीर संबंध असो की अन्य कोणताही. डोपामाइन शरीराच्या हालचाली, प्रेरणा आणि वर्तनात अनेक बदल घडवून आणते. डोपामाइन एक रासायनिक संदेशवाहक असल्याचे म्हटले जाते जे मेंदूला अनेक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते. यामुळे त्या व्यक्तीचा त्याच्या अवयवांवर कंट्रोल राहत नाही, त्याचे अवयव जसे सांगतात तसे त्यांचा मेंदू ऐकत जातो आणि कृती करायला लागतो. 

याच मेथॅम्फेटामाइनचा ओव्हरडोस झाला तर ते विष म्हणून काम करू लागते आणि त्या व्यक्तीला स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅक येऊ शकतो. सोनालीच्या बाबतीत नेमके हेच झाले. तिला हार्ट अॅटॅक आला पण तो या ड्रगमुळे. आता हे ड्रग तिला कशासाठी देण्यात आले होते हे पोलीस शोधत आहेत. 
 

Web Title: Sonali Phogat Drug Video: Which drug was given to Sonali Phogat? To make her mood or to kill, the name came out Methamphetamine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.