Sonali Phogat: ती सोनाली, मी आधीच ओळखलेले, पण...; प्रत्यक्षदर्शीने सांगितले कर्ली क्लबमध्ये नेमके काय घडलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:35 PM2022-08-27T14:35:31+5:302022-08-27T14:36:20+5:30
Sonali Phogat before Death: कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे.
भाजप नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. असे असताना कर्लीच्या क्लबमध्ये त्या रात्री काय घडलेले, सोनाली आणि तिचा पीए दोन तास बाथरुममध्ये काय करत होते आदी गोष्टींची उकल करणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला
कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे. सोनाली त्या रात्री डान्स पार्टीमध्ये नाचत होती. ती आणि तिचे स्टाफ मेंबर्स एकत्र नाचत होते. मात्र, अचानक सोनालीची तब्येत बिघडायला लागली. यामुळे थोड्या वेळाने सोनालीला तिथून जावे लागले, असे त्याने आजतकला सांगितले.
सोनालीची जेव्हा तब्येत खराब झाली तेव्हा गोंधळ उडाला. सारे तिकडे धावले. मी तिला पाहताच ओळखले की ती टिकटॉक स्टार सोनाली आहे. यानंतर लगेचच काही लोक सोनालीला टॉयलेटच्या दिशेने घेऊन जात असल्याचे मी पाहिले. यानंतर सारे आपापल्या कामात व्यस्त झाले. यामुळे आम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट पाहू शकलो नाही. नंतर आम्हाला वाटले की यात काही नवीन नाही, जास्त दखल न दिलेली चांगली, असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
चार जणांना अटक...
सोनाली त्याच्या पीएसोबत ज्या क्लबमध्ये गेली होती, त्या क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या क्लबच्या बाथरुममध्ये ड्रग्ज सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, कर्ली क्लबचा मालक आणि एक ड्रग पेडलर यांना अटक करण्यात आली आहे. सोनाली सोबत त्या क्लबमध्ये तिचा पीए, मित्र आणि आणखी दोन महिला होत्या. तसेच सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिला क्लबमधून हॉटेलवर नेण्यात आले, तो कॅब ड्रायव्हर, तिला हॉस्पिटलला नेण्यात आले तो दुसरा कॅब ड्रायव्हर यांची चौकशी केली जाणार आहे.